कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहन संवर्गासाठी नविन मालिका सुरु
ठाणे,दि.12(जिमाका):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण येथे दुचाकी या संवर्गासाठी MH05GF ही नविन मालिका साधारणतः दि.19 नोव्हेंबर 2025 रोजी सुरु करण्यात येणार आहे.
तरी नवीन दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक घेण्यासाठीचे अर्ज दि.12 ते 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत स्विकारले जातील, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment