भूमी अभिलेख विभागातील रिक्त भूकरमापक पदाची भरती प्रक्रिया सुरु


ठाणे,दि.10(जिमाका):- भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता दि.01 ऑक्टोबर 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार दि.01 ऑक्टोबर 2025 ते 24 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचे कामकाज करण्यात आलेले आहे.

या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दि.13 नोव्हेंबर 2025 व 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत वेळापत्रक खालीलप्रमाणे …

दिनांक - 13 नोव्हेंबर 2025 - सत्र -1- विभाग- पुणे विभाग, अमरावती विभाग, उमेदवारांसाठी रिपोर्टींगची वेळ - सकाळी 8.00 वा.

सत्र – 2 - विभाग- नाशिक विभाग, नागपूर विभाग, उमेदवारांसाठी रिपोर्टींगची वेळ - दुपारी 12.00 वा.

दिनांक - 14 नोव्हेंबर 2025 - सत्र -1- विभाग- मुंबई (कोकण) विभाग, उमेदवारांसाठी रिपोर्टींगची वेळ - सकाळी 8.00 वा.

सत्र - 2 - विभाग- छत्रपती संभाजीनगर विभाग, उमेदवारांसाठी रिपोर्टींगची वेळ - दुपारी 12.00 वा.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahabhumi.gov.in) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पात्र उमेदवाराने संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी. परीक्षा केंद्र बदलण्याबाबतच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही.

सामान्य प्रशासन विभागाकडील दि. 04 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्यामुळे उमेदवाराचे परीक्षा केंद्र हे महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्हा, तालुका अथवा इतर ठिकाणी असू शकते. तसेच काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतची माहिती विभागाच्या https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिताची लिंक विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे. जमाबंदी आयुक्त आणि संचालक डॉ. सुहास दिवसे (भा.प्र.से.) यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट