कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पॉश’ (POSH) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश
ठाणे,दि.17(जिमाका) :- कामाच्या ठिकाणी
महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013(POSH Act. 2013) नुसार
अंतर्गत समित्यांच्या (Internal Committee) स्थापनेबाबत विशेष तपासणी मोहीम सुरु असून
ठाणे जिल्ह्यातील 10 व 10 पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या सर्व शासकीय कार्यालये (केंद्र
व राज्य शासन) खाजगी आस्थापना, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, निमशासकीय कार्यालये,
मॉल्स, उद्योग-व्यवसाय, कंपन्या, हॉटेल्स तसेच इतर सर्व खाजगी आस्थापनामध्ये सहकारी
व खाजगी बँक, पतसंस्था, क्रीडासंकुल, कारखाने संस्थांमध्ये कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक
छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, 2013 अन्वये आवश्यक असलेल्या अंतर्गत समिती
(Internal Committee) ची स्थापना करण्यात आलेली आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी
विशेष तपासणी मोहीम सुरु करण्यात आलेली आहे.
ही मोहीम मा.
जिल्हाधिकारी ठाणे व जिल्हा अधिकारी POSH ACT ठाणे तथा उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) ठाणे
यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा कार्यक्रम
अधिकारी जि.प.ठाणे. बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी ठाणे, बालविकास प्रकल्प अधिकारी
ग्रामीण ठाणे, परीविक्षा अधिकारी, मुख्यसेविका, पर्यवेक्षिका, संरक्षण अधिकारी हे अधिकारी
तपासणी करणार आहेत.
या मोहिमेदरम्यान
विविध आस्थापनांना भेटी देऊन POSH अधिनियम, 2013 मधील तरतुदींनुसार व अंतर्गत समितीची
स्थापना, समितीची रचना, बाह्य सदस्याची नियुक्ती, वार्षिक अहवाल, जनजागृती उपक्रम.
कर्मचारी प्रशिक्षण व SHE BOX PORTAL नोंदणी व इतर कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात
येणार आहे. शासन महिला व बाल विकास परिपत्रक १४ मे २०२६ तपासणी सूचीनुसार
तपासणी करण्यात येणार आहे.
सर्व संबंधित
आस्थापनांनी तपासणीअधिकारी यांना आवश्यक सहकार्य करावे तसेच अंतर्गत तक्रार समिती स्थापन
केलेली नसल्यास तत्काळ कायद्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. POSH अधिनियमाचे
पालन करणे ही प्रत्येक पात्र आस्थापनेची कायदेशीर जबाबदारी आहे. POSH अधिनियमाचे उल्लंघन
केले असल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
या मोहिमेचा
उद्देश महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक व छळमुक्त कार्यस्थळ निर्माण करणे तसेच कायद्याच्या
प्रभावी अंमलबजावणीस प्रोत्साहन देणे हा आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
ठाणे नमिता शिंदे यांनी कळविले आहे.
000000000000
Comments
Post a Comment