शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज व्याज परतावा योजना
ठाणे,दि.2(जिमाका) :- शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ व महामंडळाच्या इतर तेरा
उपकंपन्या मार्फत लघुउद्योग व व्यवसायाकरीता इतर मागासप्रवर्गातील गरजू व होतकरु व्यक्तींना
कर्ज पुरवठा केला जातो. त्या अनुषंगाने सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरीता विविध योजनांचे
ठाणे जिल्ह्याकरीता भौतिक व आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या ऑनलाईन योजनांमध्ये
20% बीज भांडवल योजना व 1.00 लक्ष पर्यंत थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा,
गट कर्ज व्याज परतावा, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा व महिला स्वयंसिध्दी कर्ज व्याज
परतावा योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. रु.1.00 लक्ष थेट कर्ज योजनेकरिता अर्जदाराचा
सिबिल क्रेडीट स्कोर हा किमान 500असणे बंधनकारक आहे. सर्व ऑनलाईन योजनांसाठी सर्वप्रथम
महामंडळांच्या www.msobcfdc.org या वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करुन घ्यावी. अर्जदाराने
स्वतःच्या जातप्रमाणपत्रातील नमूद जातीनुसार लागू असलेल्या महामंडळाच्या उपकंपनीमध्ये
जाऊन आवश्यक ती योजना निवडावी. तद्नंतर अर्जदाराने महामंडळाच्या नियमानुसार आवश्यक
असलेल्या मुळ कागदपत्रांच्या PDF सुस्पष्ट प्रती पोर्टलवर अपलोड करावी. अर्ज स्विकारण्याची
संपूर्ण प्रक्रीया ऑनलाईन प्रणालीद्वारे असेल, याकरीता जिल्हा कार्यालयामध्ये प्रत्यक्ष
संपर्क साधल्यास अर्जदाराला योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी
जिल्हा कार्यालयाचा पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला, दत्तवाडी,
कळवा (प), ठाणे-४०० ६००५ कार्यालय दूरध्वनी-
०२२-२०८१३६२५ येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा
असे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक
गंगाधर विठ्ठल डोईफोडे यांनी केले आहे.
योजना - 20 टक्के बिज भांडवल कर्ज योजना, भौतिक उद्दीष्ट - 18, आर्थिक उद्दीष्ट
(रु.लाखात) - 11.5.
योजना - थेट कर्ज योजना (1लक्ष), भौतिक उद्दीष्ट - 160, आर्थिक उद्दीष्ट (रु.लाखात)
- 160.0.
योजना - वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, भौतिक उद्दीष्ट - 125, आर्थिक उद्दीष्ट
(रु.लाखात) - 187.50.
योजना - शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, भौतिक उद्दीष्ट - 49, आर्थिक उद्दीष्ट
(रु.लाखात) - 29.40.
योजना - गट कर्ज व्याज परतावा योजना, भौतिक उद्दीष्ट - 44, आर्थिक उद्दीष्ट
(रु.लाखात) - 61.60.
योजना - महिला स्वयंसिध्दी कर्ज ब्याज परतावा योजना, भौतिक उद्दीष्ट - 50, आर्थिक
उद्दीष्ट (रु.लाखात) - 3.00.
0000000000
Comments
Post a Comment