१३.५९ सेकंदांचा थरार आणि तिरंग्याची शान! शौर्या अंबुरेची युथ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी
ठाणे,दि.9(जिमाका) :- ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोखत येथील प्रतिभावान क्रीडापटू शौर्य अंबुरे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक कामगिरी फडकवली आहे. डकार २०२६ युथ ऑलिम्पिक गेम्समधील महिलांच्या १०० मीटर हर्डल्स (अडथळा दौड) स्पर्धेत शौर्या अंबुरे हिने कांस्यपदकाची कमाई करत संपूर्ण देशासह ठाणे जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. अत्यंत अटीतटीच्या व रोमांचक झालेल्या या स्पर्धेत तिने १३.५९ सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवत केवळ पदकच जिंकले नाही, तर १३.७० सेकंदाचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अविनाश अंबुरे आणि रूपाली अंबुरे यांची ही कन्या असून, घरच्या संस्कारांमधून मिळालेली जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यशाने ठाणे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले असून संपूर्ण ठाणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. ...