जागतिक एड्स दिनानिमित्त ठाण्यात 1 डिसेंबर रोजी भव्य जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन
ठाणे,दि.23(जिमाका) :- दरवर्षी 1 डिसेंबर हा दिवस 'जागतिक एड्स दिन' म्हणून विविध जनजागृतीपर उपक्रम, कार्यक्रम व स्पर्धांच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो. या वर्षी जागतिक एड्स दिन 2026 चे घोषवाक्य (थीम) "Ending AIDS starts with access" अर्थात "एड्समुक्तीची सुरुवात सर्वांना आवश्यक सेवांचा समान प्रवेश" असे निश्चित करण्यात आले आहे. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई (महाराष्ट्र शासन) यांच्या अंतर्गत कार्यरत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 1 डिसेंबर 2026 रोजी शहरात जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रभातफेरीची सुरुवात सकाळी 9.00 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथून होणार आहे. ही रॅली रहेजा गार्डन पोलीस स्टेशन, तीन हात नाका सर्व्हिस रोड आणि ज्ञानसाधना कॉलेज या मार्गे मार्गक्रमण करत सकाळी 10.30 वाजता पुन्हा सामान्य रुग्णालय, ठाणे येथे समाप्त होईल. या जनजागृती रॅलीमध्ये शहरातील सुमारे 400 ते 500 विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असल्याची माहिती ...