मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे समाधान समारोह २०२६ अंतर्गत २१, २२ आणि २३ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष लोकअदालत

 




ठाणे,दि.30 (जिमाका) :- मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे  आर.डी. सावंत यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्ह्यातील पक्षकार यांना आवाहन करण्यात येते की, मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे समाधान समारोह २०२६ (SAMADHAN SAMAROH) या अंतर्गत २१, २२ आणि २३ ऑगस्ट, २०२६ रोजी विशेष लोकअदालत (SPECIAL LOK ADALAT) चे आयोजन केले आहे.

त्यानुसार मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्याकडील प्रलंबित असलेल्या प्रकरणांमधील पक्षकारांना लोकअदालतपूर्व तडजोड तसेच प्रकरण लोकअदालतमध्ये ठेवणेकामी संमती दर्शविण्याकरीता या प्राधिकरणामार्फत नोटीसेस पाठविण्यात आलेल्या असून मा. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांतील ठाणे जिल्ह्यातील/इतर जिल्ह्यातील संबंधीत पक्षकारांना तडजोड पूर्व चर्चा करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे, न्याय सेवा सदन इमारत, पहिला मजला, जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे आवार येथे प्रत्यक्ष अथवा अभासी पध्दतीने संपर्क करण्यास कळविलेले आहे. तरी, संबंधीत पक्षकारांनी समाधान समारोह 2026 (SAMADHAN SAMAROH) या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे सचिव आर.एस. पाजणकर यांनी केले आहे.

000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी

79 व्या स्वातंत्र्यदिनासाठी राजशिष्टाचार जारी; ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय कार्यक्रम