Posts

Showing posts from January, 2020

महाराष्ट्रातील धनगर समाजासाठी घरकुल योजना

               ठाणे दि.३१ जिमाका : महाराष्ट्रातील भटक्या व विमुक्त जमातीमधील धनगर समाजातील लोकांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन लोकांसाठी दहा हजार वैयक्तिक लाभार्थी घरकुल बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.     सदर योजनेकरिता जातीचा दाखला, आधार कार्ड, १ लाख रुपयाच्या आतील उत्पन्नाचा दाखला, नमुना नं ८ स्वत:च्या मालकीची जागा, यापूर्वी महाराष्ट्रात कुठेही घरकुलाच लाभ घेतला नसल्याचे १०० रुपयाच्या स्टॅम्पवरवर प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, विहित नमुन्यातील अर्जासोबत जोडून हे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२० आहे. अधिक माहितीकरिता तालुक्यातील गटविकास अधिकारी पंचायत समिती व जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क   साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,ठाणे बलभीम शिंदे यांनी केले आहे.

नाशिक व इगतपुरीमध्ये एकात्मिक फालोत्पादन अभियान

ठाणे दि ३१ जिमाका :   एकात्मिक फलोत्पादन अभियान सन २०१९-२०२० मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रशेत्र ( on farm training ) कार्यक्रम ठाणे जिल्ह्यात मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे यांनी आयोजित केला आहे. सदरचा अभ्यासदौरा दिनांक १० फेब्रुवारी २०१९ ते २४ फेब्रुवारी २०२० असा एकूण ०५ दिवस नाशिक जिल्ह्यातील नाशिक उपविभागातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर आयोजित करण्यात आला आहे. नाशिक मधील चिंचवड व सतपुर गावातील तपशील हा आंबा घन लागवड व रोपवाटिका, आनंद अॅग्रो , भगर मिल, बेन्सन अॅग्रो , नवयुग ब्लोअर असा आहे. त्याचबरोबर पिंपळगाव खांब, बेळगाव ढगा या गावांचा तपशील वनदेवी रोपवाटिका, भाजीपाला रोपवाटिका असा आहे, तसेच मोहाडी गावातील तपशील सह्याद्री फार्म एफ पी ओ आहे, गंगापूर व गोवर्धन गावात कृषि विज्ञान केंद्र नाशिक, सिला वाईन्स व वायनरी असा तपशील आहे. तसेच इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी गावाचा तपशील हा भात संशोधन केंद्र, सेंद्रीय शेती,लाकडी घाना तेल केंद्र,गुळ असा आहे.     अभ्यासदौऱ्यासाठी तालुका निहाय कल्याण-१२, उल्हासनगर-१२, भिवंडी-२०, मुरबाड-२६, शहापूर-३० असा एक...
           5 फेब्रुवारी पर्यंत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन    ठाणे दि.28 जिमाका :महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यन्वित आहे. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार ,   शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार , जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) , राज्य क्रीडा साहसी पुरस्कार , शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) , शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सन 2018 -2019 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावेत.       या पुरस्कारासाठी ONLINE व ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येईल. संबंधितानी   ONLINE अर्जामध्ये आपल्या कामगिरीच्या तपशिलासह WWW.mumbaivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या लिंक वर अर्ज व संबंधित माहिती...
Image
केंद्र पुरस्कृत योजनाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा- खासदार राजन विचारे                                  --------------   दिशा समितीत   घेतला केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा ठाणे दि.29 जिमाका: केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी काटेकोरपणे   करुन   पात्र लाभार्थांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करावा असे निर्देश जिल्हा   विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) अध्यक्ष तथा खासदार राजन विचारे यांनी सर्व विभागांना दिले. आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात सन 2019-20 ची दिशा सभा संपन्न   झाली. त्यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पुढे श्री. विचारे म्हणाले की , दिशा समितीची बैठक नियमित दर तीन महिन्यांनी होईल. त्यावेळी संबधित विभागाच्या विभाग प्रमुखांनी विषयाच्या सखोल माहितीसह उपस्थित राहायला हवे. असे त्यांनी सांगितले. यावेळी   जि...

ठाणे जिल्ह्यात शिवभोजन योजनेचा शुभारंभ गरजू व्यक्ती पर्यंत शिवभोजन पोहचविणार -पालकमंत्री शिंदे

Image
ठाणे , दि. 26 जानेवारी :   जिल्ह्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे   यांनी केले.     संतोषी माता महिला बचतगट यशोधननगर आणि    लक्ष्मी कँटरर्स लोकमान्य नगर येथे   शिवभोजन योजनेचा शुभारंभ पालकमंत्री श्री. शिंदे   यांच्या हस्ते करण्यात आला.            राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना सुरु केली   आहे. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या , एक वाटी भाजी , एक वाटी वरण , भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येईल. भोजनालय चालवण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असणाऱ्या खानावळ , एनजीओ , महिला बचत गट , भोजनालय , रेस्टोरेंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात सात ठिक...

पायाभुत सुविधांबरोबरच पर्यटन विकासाला प्राधान्य--- पालकमंत्री एकनाथ शिंदे

Image
               ठाणे दि. २६ जिमाका: जिल्ह्यातील आरोग्य , शिक्षण , रस्ते , उद्योग   आणि सिंचन सुविधांचा विकास करण्याबरोबर ठाणे   जिल्हा पर्यटन हब म्हणून विकसित करण्यास जिल्हा   प्रशासनाचे प्राधान्य असेल , असे पालकमंत्री एकनाथ शिंदे   यांनी आज येथे सांगितले. भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त पोलीस मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणातून नागरिकांना शुभेच्छा देताना ठाणे जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली. पालकमंत्री श्री शिंदे म्हणाले समाजाच्या सर्व घटकांचा विकास होण्यासाठी राज्य   सरकारने विविध योजना आखल्या आहेत. त्यांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. मात्र विकासाचा वेग अधिक गतिमान करण्यासाठी सर्व अधिकारी - कर्मचारी आणि विभागांनी प्रभावी कामगिरी करायला हवी.जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून गेली दोन वर्षे भरीव निधीची तरतूद केली आहे. ५३७ कोटींचा आराखडा निश्चित करण्यात...

ठाणे जिल्ह्यासाठी ४७५ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता अखर्चित निधीस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Image
ठाणे दि. २० जिमाका : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत ठाणे जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ च्या ३३२.९५ कोटी रुपयांच्या आणि अनुसूचित जमाती उपयोजनेतर्गत ७१.१२   कोटी रुपयांच्या तसेच समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत ७०.७३ अशा एकूण ४७५ कोटी कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच २०१९-२० च्या पुनर्विनियोजन प्रस्तावास देखील मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध विभागांना देण्यात निधी वेळेत खर्च करावा. अखर्चित निधीस जबाबदार असणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला यावेळी   जिल्हापरिषद   अध्यक्ष दिपाली पाटील , खासदार श्री.कपिल पाटील. श्रीकांत शिंदे , आमदार   श्री. रईस शेख , श्री. बालाजी किणीकर ,   कुमार आयलानी,   श्री. गणपत गायकवाड , श्री. रविंद्र चव्हाण , श्री. प्रमोद पाटील , .श्री. संजय केळकर , . श्री . शांताराम मोरे , श्री. किस...

नागरिकांनी संकल्प केल्यास एकल उपयोगाचे प्लास्टिक मुक्त भारत सहज शक्य -- राज्यपाल

Image
       ठाणे दि. १९ जिमाका : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर स्वरुपाचे दुष्परिणाम होत आहेत.   प्रत्येक नागरिकाने एकल वापराच्या प्लास्टिक वापरावर नियंत्रण आणण्याचा संकल्प केला तर एकल उपयोगाचे प्लास्टिक मुक्त भारत सहज साध्य असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी उत्तन   येथे ' एकल उपयोग प्लास्टिक निर्मुलन : शक्यता आणि संधी ' या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषद २०२० च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर प्रबोधिनी चे उपाध्यक्ष खा. विनय सहस्त्रबुद्धे , उद्योजक निरंजन हिरानंदानी , श्रीमती रेखा महाजन , महासंचालक रविंद्र साठे , रविंद्र पोखरणा , उमेश मोरे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री कोश्यारी म्हणाले , सर्वसामान्य   पण जबाबदार नागरीक म्हणून आपण प्लास्टिकचे दुष्परिणाम वेळीच जाणायला हवेत. वास्तविक पाहता प्लास्टिक आपला शत्रू नाही , परंतु ज्या प्रकारे गरज नसताना प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय , ते थांबवणे आवश्यक आहे. बऱ्याच   वेळेस सम...

सामाजिक जीवनात प्रामाणिकपणा महत्त्वाचा - राज्यपाल

Image
ठाणे दि.19 जिमाका :चांगले कर्म , निस्वार्थ सेवा आणि प्रामाणिकपणा ही यशस्वी होण्याची त्रिसुत्री आहे. सामाजिक जीवनात काम करतांना प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.ठाणे येथिल आर. जे. ठाकुर महाविद्यालयात चंद परिवार फाउंडेशन आयोजित पाचव्या   वार्षिक समारंभामध्ये ते बोलत होते. यावेळी चंद परिवार फाउंडेशनचे   नॅशनल कमिटी अध्यक्ष दिबी चंद , उपाध्यक्ष प्रकाश राजन , महासचिव महेश रजवाल , केंद्रीय कोषागार अध्यक्ष नवीन चंद ठाकुर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी   म्हणाले चंद परिवार फाउंडेशन पाच वर्षे खुप चांगल्या प्रकारे समाजोपयोगी कार्ये करीत   आहेत. त्यांनी त्यांचे हे कार्य असेच पुढे   चालू ठेवावे. चांगल्या कामाची समाज नेहमी दखल घेत असतो. हिंदी ही राष्ट्रीय भाषा असली तरी महाराष्ट्रात आपण राहतो तर मराठी बोलायला शिकले पाहिजे.   परिवार फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट    काम केल्या बदल सुरेश राणाजी , बिरेंद्र नेगी , डॉ.दिनेश चंद यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या   हस...

१९ जानेवारी रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा

ठाणे दि. १६ जिमाका : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ ( MAHATET) रविवार दि. १९ जानेवारी २०२० रोजी होणार आहे. त्याचबरोबर पेपर १ साठी ७५९० व पेपर २ साठी ५६६५ असे एकूण १३२५५ परीक्षार्थींची परीक्षा घेण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेकरीता एकूण ४० केंद्रांची निवड करण्यात आली आहे. परीक्षा पेपर १ सकाळ सत्र व पेपर २ दुपार सत्र अशा दोन सत्रात घेण्यात येणार आहे. परीक्षेकरिता ठाणे व कळवा शहरातील सकाळ सत्रासाठी २३ परीक्षा केंद्र व दुपार सत्रासाठी १७ परीक्षा केंद्रांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रासाठी केंद्र संचालकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ७ झोन आखण्यात आले असून पेपर १ साठी ४ झोन व पेपर २ साठी ३ झोन आखण्यात आले आहेत.     परीक्षा गृहात मोबाईल आणण्यास मनाई आहे. तसेच उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा सदस्य सचिव जिल्हा परीक्षा आयोजन व संनियंत्रण समिती यांनी कळविले आहे.  

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा येणे आवश्यक --- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Image
ठाणे   दि. १५ : महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यामध्ये सांस्कृतिक आदान प्रदान व एकतेची भावना आहे.   मराठी आणि उत्तराखंडातली पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. मराठी बोलणं फारसं अवघड नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा बोलता येणे आवश्यक आहे.   महाराष्ट्रात राहता तर मराठी भाषा   शिका असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज नवी मुंबईत केले. वाशी येथे उभारण्यात आलेल्या उत्तराखंड भवनचे   लोकार्पण राज्यपाल   श्री कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत , उत्तराखंड राज्याच्या आदिवासी मंत्री रेखा त्यागी , महापौर जयवंत सुतार ,   आमदार गणेश नाईक   ,   मंदा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.   उत्तराखंड राज्याप्रमाणे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव वाढविण्यासाठी राज्यशासनाशी चर्चा करणार असल्याचे सांगून श्री कोश्यारी म्हणाले पंतप्रधान     नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील देश प्रगती करत आहे. पंतप्रधान ग्राम सडक...

अवैध रेती उपसा विरोधात जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई

अवैध रेती उपसा विरोधात जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई ६ कोटी ४८   लाखाचा मुद्देमाल नष्ट ठाणे दि. १३ -- ठाणे जिल्ह्यातील अवैध वाळू   उत्खनन व वाहतूक करणाऱ्याच्या   विरोधात महसूल विभागाने हाती घेतलेल्या धडक कारवाईमध्ये सुमारे ६ कोटी ४८   लाखाचे साहित्य आणि रेतीसाठा जप्त व नष्ट करण्यात आला असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी दिली.   ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पारसिक कळवा रेती बंदर , काल्हेर रेती बंदर , वडूनवघर , खारबाव , वेहळे , उल्हास नदी खाडी   पात्र , टेभा , तानसा    या परिसरातील खाडी किनारी सक्शन पंपांच्या साहाय्याने अवैध रेती उपसा मोठ्या प्रमाणावर होतो अशा तक्रारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार   अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळपासूनच ठाणे ,   कल्याण , भिवंडी आणि शहापूर   तहसिलदार यांनी धडक   कारवाई हाती घेतली. आजच्या या कारवाईमध्ये ३२ सक्शनपंप व २५   बार्ज गॅस कटरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आले.   तर...