Posts

Showing posts from April, 2025

ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आवारातील “टेरेस गार्डन”च्या निर्मिती उपक्रमाचे उद्घाटन संपन्न

Image
ठाणे,दि.30(जिमाका):-  ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या आवारात  “ टेरेस गार्डन ”  उपक्रमाची निर्मिती करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी महोदयांच्या स्वीय सहाय्यक स्व.पल्लवी सरोदे यांच्या स्मरणार्थ वॉटर लिली व कमळाचे रोप लावून करण्यात आली. याचा एक पुढील टप्पा म्हणून आज निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांच्या हस्ते  “ टेरेस गार्डन ”  उपक्रमाच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार सचिन चौधर, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे, वृक्षतज्ञ विजयकुमार कट्टी, आसरा फाऊंडेशनचे मोहन शिरकर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे ठाणे जिल्हा समन्वयक शुभम महेंद्र शिंदे, स्नेहा एन्टरटेंमेंटचे अमन कोईरी, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी व आसरा फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये तसेच स्वयंसेवी संस्थांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Image
ठाणे,दि.30(जिमाका):-  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी तहसिलदार सचिन चौधर, महाराष्ट्र विरशैव लिंगायत सभा, ठाणे जिल्हा अध्यक्ष शांतकुमार लच्याणे तसेच डोंबिवली विरशैव लिंगायत चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवलीचे सदस्य उपस्थित होते. 00000

महाराष्ट्र दिनी पोलीस पाटील गिरीधर पाटील यांचा राज्यपाल पुरस्काराने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार सन्मान

ठाणे,दि.29(जिमाका):-  शासन निर्णयातील तरतूदीनुसार जिल्ह्यातील पोलीस पाटील यांना दरवर्षी राज्यपाल पुरस्कार प्रदान करण्यात येतो. विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार देण्याकरिता श्री.गिरीधर रघुनाथ पाटील, पोलीस पाटील, वळगांव, ता.भिवंडी यांच्या नावाची जिल्हा निवड समितीने एकमताने निवड केली आहे. त्यानुषंगाने दि.1 मे 2025 रोजी श्री.गिरीधर रघुनाथ पाटील, पोलीस पाटील यांना ठाणे जिल्ह्याच्या महाराष्ट्र दिन मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या वेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे. 00000

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

ठाणे,दि.29(जिमाका):-  महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवार, दि.01 मे 2025 रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 07.10 वाजता जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होणार आहे. तरी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. 00000

महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदानावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

Image
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ठाणे,दि.29(जिमाका):-  महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण गुरुवार, दि.01 मे 2025 रोजी पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे सकाळी 08 वाजता उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. 00000

ठाणे जिल्हा प्रशासनातील 9 उपजिल्हाधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती

ठाण्याच्या अपर जिल्हाधिकारी पदी हरिश्चंद्र पाटील यांची नियुक्ती   ठाणे,दि.28(जिमाका ) :-  निवडसूची वर्ष 2024-25 मध्ये उपजिल्हाधिकारी (निवडश्रेणी )   संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील 9 अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. सह आयुक्त  ( पुनर्वसन), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे या रिक्त पदी श्री.विकास गजरे, अपर जिल्हाधिकारी, ठाणे या पदी श्री.हरिश्चंद्र पाटील, सह आयुक्त  ( पुनर्वसन), विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर या पदी श्री.संभाजी अडकुणे, अपर जिल्हाधिकारी, सातारा या पदी श्री.मल्लिकार्जुन माने, अपर जिल्हाधिकारी, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., मुंबई या पदी श्री.इब्राहीम चौधरी, अपर जिल्हाधिकारी, महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या पदी श्रीमती सुचिता भिकाणे, व्यवस्थापकीय संचालक, रेशीम उद्योग महामंडळ, पुणे या पदी श्रीमती पद्मश्री बैनाडे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, अमरावती या पदी श्री.विठ्ठल इनामदार व...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात “सेवा हक्क दिन” उत्साहात साजरा

Image
ठाणे,दि.28(जिमाका:-  शासनात सर्वत्र दि.28 एप्रिल हा दिवस  “ सेवा हक्क दिन ”  म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची "दशकपूर्ती" आणि "प्रथम सेवा हक्क दिन ”   निमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  “ सेवा हक्क दिन ”  आज उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  “ सेवा हक्क शपथ ”  घेतली तसेच सेवा हक्क दिन उपक्रमास दहा वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल जिल्हा व तालुका पातळीवर विविध विशेष उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार सचिन चौधर, संदिप थोरात, रेवण लेंभे, अमोल कदम, जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले, नायब तहसिलदार विठ्ठल दळवी, राहूल सूर्यवंशी, संतोष भोईर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक व ठाणे तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालक उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत सध्या हजार...

ठाणे जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी धार्मिक नेत्यांचा पुढाकार

MSVT संस्थेचा उपक्रम यशस्वी   ठाणे,दि.28(जिमाका:-   ठाणे जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी MSVT संस्थेने राबवलेल्या जनजागृती मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः धार्मिक नेत्यांनी बालविवाहविरोधात सक्रिय भूमिका घेतल्याने या अभियानाला नवे बळ मिळाले आहे. अक्षय्य तृतीया च्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या लग्नसराईच्या काळात बालविवाहाच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, MSVT ने सर्व धर्मगुरूंना एकत्र आणत बालविवाह थांबवण्याचे आवाहन केले. यानुसार जिल्ह्यातील सर्व मंदिरे, मशिदी आणि चर्च यांसमोर  “ येथे बालविवाहास परवानगी नाही ”  असे स्पष्ट फलक लावण्यात आले आहेत. MSVT संस्थेचे अध्यक्ष श्री.मनोज गावंड यांनी सांगितले, "बालविवाह रोखण्यासाठी सर्वप्रथम धार्मिक नेत्यांना सहभागी करणे आवश्यक आहे. कारण त्यांच्या वतीनेच विवाह विधी पूर्ण होतो. त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळाल्यास बालविवाहावर प्रभावीपणे आळा घालता येतो." शिक्षेचे गांभीर्य समजावतना गावंड यांनी पुढे सांगितले की, बालविवाह प्रतिबंध अधिनियम (PCMA), 2006 अंतर्गत बालविवाह आयोजित करणे, सेवा देणे किंवा प्रोत्साहन देणे ह...

जिल्ह्यात दि.10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Image
ठाणे,दि.28(जिमाका:-  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दि.10 मे 2025 रोजी  “ राष्ट्रीय लोकअदालत ”   चे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखल पूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवता येतील. संबंधितांनी ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी व राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ घेण्यासाठी शनिवार, दि.10 मे 2025 रोजी आयोजित केलेल्या लोकअदालतीमध्ये आपली प्रकरणे ठेवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी केले आहे. लोक अदालतच्या निवाड्याविरुध्द अपील नाही, एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते, खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दिर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपआपसात समजुतीने होत असल्याने कुणाची हार वा जीत होत नाही. लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो, परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटुता...

विशेष लेख क्र.18: “WAVES 2025” - माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला नवी दिशा.. ठाणे जिल्ह्यासाठी मोठी आशा..!

Image
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र आज एका महत्त्वपूर्ण वळणावर उभे आहे. तंत्रज्ञानाचा वेगवान विकास, जागतिकीकरण आणि प्रेक्षकांच्या बदलत्या आवडीनिवडींमुळे या क्षेत्रात नवीन संधी आणि आव्हाने निर्माण झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर, देशातील माध्यम व मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील एक सूवर्णक्षण म्हणून ओळखली जाणारी ‘WAVES 2025’ ही जागतिक परिषद मुंबईत दि.01 ते 04 मे 2025 या कालावधीत संपन्न होणार आहे. केवळ भारतच नव्हे, तर जागतिक स्तरावर माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला एकत्र आणणारा, नवसृजनाला चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी नवीन क्षितिजे निर्माण करणारा हा एक महत्त्वाचा मंच ठरणार आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि येथील प्रतिभावान मनुष्यबळ यांचा संगम या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे. ठाण्याची भूमिका आणि महत्त्व: मुंबई आणि महाराष्ट्राचे मनोरंजन क्षेत्रातील अनमोल योगदान सर्वश्रुत आहे. बॉलिवूड, टेलिव्हिजन आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून या राज्याने नेहमीच देशाला आणि जगाला उत्कृष्ट मनोरंजन पुरविले आहे. आता ‘WAVES 2025’ च्या माध्यमातून याच मुंबईला आणि पर्यायाने महाराष्ट्राला ज...

सामान्य नागरिकांना लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक तो विचार आणि उपाययोजना आवश्यक - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक

Image
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न   ठाणे,दि.26(जिमाका):-  आपल्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही आपण सामान्य नागरिकांना वेळेवर न्याय देवू शकत नाही, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. आजच्या परिस्थितीत सामान्य माणसाला लवकर न्याय मिळण्यासाठी आवश्यक तो विचार आणि उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी आज येथे केले. सध्याच्या जिल्हा न्यायालय, ठाणे आवारातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती शार्मिला देशमुख, न्यायमूर्ती गौरी गोडसे, न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे, न्यायमूर्ती अद्वैत सेठना, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे श्रीनिवास अग्रवाल, ...

थकीत कराच्या वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

ठाणे,दि.25(जिमाका):-  मोटार वाहन कर जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूली योग्य असलेल्या रक्कमेच्या मागणी प्रित्यर्थ येणे असलेल्या रक्कमेच्या वसुलीसाठी खाली निश्चित केलेली जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात आलेल्या आहेत. या कराची थकबाकी दि.02 मे 2025 पूर्वी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण, बिर्ला कॉलेज जवळ, सह्याद्री नगर, चिकणघर, कल्याण (प.) - 421301 यांच्याकडे देण्यात आली नाही तर ही वाहने दि.05 मे 2025 रोजी ई-लिलावाद्वारे विकण्यात येतील. ई-लिलावाच्या दिनांकानंतर थकबाकीदारस वाहनाचा कर भरण्याचा तसेच मालकी हक्काचा अधिकर राहणार नाही. अशा तऱ्हेने केलेली विक्री कायम होण्यास अधीन राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे. ई-लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या वाहनाचे क्रमांक पुढील प्रमाणे आहेत :- MH43BA1035, MH02CR4012, MH05AZ1469, MH04G8371, MH04DD4764, MH04DD9516, MH05AZ0995, MH05CP3552, MH05Z6466, MH05BG8862, MH05Z4610, MH05Z8881, MH05Z6063, MH05BG0447, MH05BG5572, REG NO NOT FOUND, REG NO NOT FOUND, REG NO NOT FOUND, REG NO NOT FOUND, MH05BG4544, MH05CG8177, M...

विशेष लेख क्र.17 - वेव्हज 2025 : भारतासाठी जागतिक कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

Image
  जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025’ अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. 1 मे ते 4 मे 2025 दरम्यान मुंबई येथील जिओ कन्व्हेशन सेंटर, बीकेसी येथे होणारी ही भव्य समिट, भारताला जागतिक पातळीवर ‘कंटेंट सुपरपॉवर ’   म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार भारताने क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून नेहमीप्रमाणे मुंबईने क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करायला तयार आहे. WAVES 2025 ही केवळ एक शिखर परिषद नाही, तर भारताच्या सर्जनशील शक्तीला, जागतिक गुंतवणुकीला आणि धोरणात्मक बदलांना चालना देणारा परिवर्तनशील क्षण आहे. भारताने याचा उपयोग करून जागतिक कंटेंट क्षेत्रावर आपला ठसा उमटवावा, अशी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांची अपेक्षा आहे. WAVES 2025: का आहे ही परिषद खास? भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन (Media & Entertainment – M&E) उद्योग हा वेगाने प्रगत होत असलेला आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. OTT, अ‍ॅनिमेशन, गे...

दि.28 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे “सेवा हक्क दिन” कार्यक्रमाचे आयोजन

ठाणे,दि.24(जिमाका):-   सामान्य प्रशासन विभागाच्या दि.01 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णय क्र.GAD/९४/२०२४-Lokshahidin अन्वये दि.28 एप्रिल हा दिवस  “ सेवा हक्क दिन ”  म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. तसेच मुख्य आयुक्त राज्य सेवा हक्क आयोग, मुंबई यांच्या पत्रान्वये दि.28 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या अंमलबजावणीस दहा वर्ष पूर्ण होत असल्याने, या दशकपूर्तीचे औचित्य साधून जिल्हास्तरावर तसेच ग्रामपातळीवर विशेष उपक्रम राबविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यानुषंगाने दि.28 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली पाचवा मजला, समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे सकाळी 11 वाजता  “ सेवा हक्क दिवस ”  निमित्ताने एकत्रित शपथ घ्यावयाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी दि.28 एप्रिल 2025 रोजी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) हरिश्चंद्र पाटील यांनी केले आहे. 00000

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते 26 एप्रिल रोजी ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

Image
         ठाणे,दि.24(जिमाका):-  जिल्हा न्यायालय, ठाणे आवारातील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शनिवार, दि.26 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. हा उद्घाटन समारंभ उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती शार्मिला देशमुख, न्यायमूर्ती गौरी गोडसे, न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे, न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे श्रीनिवास अग्रवाल यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, असे ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रशांत कदम व जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, ठाणे सुर्यकांत शिंदे यांनी कळविले आहे. 00000