1 ऑक्टोंबर जागतिक जेष्ठ नागरिक दिवस कार्यक्रम संपन्न
ठाणे,दि.05(जिमाका) : भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्वावरील
अनुच्छेद 39 क व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे
समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये,
त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक / मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये
त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी
राज्याचे सर्वसमावेशक धोरण दि.9 जुलै, 2018 च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात
आले आहे. सदर शासन निर्णयातील तरतूदीनुसार, 1 ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ
नागरिक दिवस (International Day of Older Person) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला
आहे.
त्याअनुषंगाने जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त 1 ऑक्टोंबर
2026 रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन, 4 था मजला, स्वामी समर्थ मठासमोर, खारीगांव, कळवा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले होते. तसेच ज्येष्ठ नगारिकांसाठी डिजीटल साक्षरता या कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी अॅङ प्रमोद ढोकळे, सल्लागार, फेसकॉम व दिपा खाडे,
पोलीस निरीक्षक, ठाणे ग्रामिण यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक अरुण
साळुंखे, सहायक लेखाधिकारी, सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे यांच्यामार्फत आलेल्या
सर्व मान्यवरांचे तसेच जेष्ठ नागरिकांचे आभार मानन्यात आले तसेच कार्यक्रम संपल्याचे
जाहीर झाल्यानंतर सर्व ज्येष्ठ नागरिकांनी भोजनाचा आस्वाद घेतला, असे समाज कल्याण,
ठाणे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी कळविले आहे.
000000000
Comments
Post a Comment