ठाणे व पालघर अन्न व औषध प्रशासनाची प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूविरुद्ध धडक कारवाई सुमारे रु.2 कोटी 69 लाख 29 हजार 860 किमतीचे प्रतिबंधित अन्न पदार्थ व वाहने जप्त

 



ठाणे,दि.03(जिमाका) : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या पान मसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थांची अवैध वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्यामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ठाणे व पालघर विभागातील ठाणे झोन-10, ठाणे झोन-07 तसेच पालघर झोन-01 येथे दि. 02 ऑक्टोबर 2026  रोजी विविध ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली.

            या कारवाईमध्ये एकूण रु. 2,69,29,860/- किमतीचे प्रतिबंधित अन्न पदार्थ व वाहने जप्त करण्यात आली आहेत.

1. ठाणे झोन-10 मधील कारवाई

दिनांक 02 ऑक्टोबर 2026 रोजी प्रतिबंधित अन्न पदार्थांची वाहतूक करणारा Eicher ट्रक क्र. MH-18-BZ-4528 हा येवई ब्रिज परिसरात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनास प्राप्त झाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच गुन्हे शाखेचे PSI श्री. शिवाजी झांजुर्णे व इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने सदर वाहनावर छापा टाकून तपासणी केली.

            या वाहनामध्ये खालील प्रतिबंधित अन्न पदार्थ आढळून आले :

प्रतिबंधित अन्न पदार्थ - Premium Raj Niwas Pan Masala, प्रमाण - 27,540 पाकिटे, किंमत - रु.55,08,000/-.

प्रतिबंधित अन्न पदार्थ - ZN-01 Zafrani Zarda, प्रमाण - 27,540 पाकिटे, किंमत - रु. 26,43,840/-. एकूण किंमत - रु.81,51,840/-

 

            याशिवाय Eicher ट्रक क्र. MH-18-BZ-4528, अंदाजे किंमत रु. 20,00,000/-, जप्त करण्यात आला.

            त्यामुळे या कारवाईमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ व वाहनाची एकूण किंमत रु.1,01,51,840/- इतकी आहे.

            या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथे FIR क्र. 763/2026, दि. 02 ऑक्टोबर 2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            या प्रकरणी BNS कलम 123, 223, 274, 275 तसेच Food Safety and Standards Act, 2006 मधील कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(e), 30(2)(a), 3(1)(zz)(iv) सह कलम 59 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

2. पालघर झोन-01 मधील कारवाई

दि.02 ऑक्टोबर 2026 व 03 ऑक्टोबर 2026 रोजी पालघर झोन-01 अंतर्गत चारोटी टोलनाका, चारोटी, ता. डहाणू, जि. पालघर येथे प्रतिबंधित अन्न पदार्थांची वाहतूक व विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी धडक कारवाई करण्यात आली.

            या कारवाईमध्ये वाहन चालक फिरोज खाजा मिया सय्यद, तसेच इतर 06 आरोपींचा सहभाग आढळून आला.या कारवाईमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थांची किंमत रु. 43,50,000/- असून, Eicher Closed Body Truck क्र. TG12U4371, अंदाजे किंमत रु. 20,00,000/-, जप्त करण्यात आला.

            या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्न पदार्थ व वाहनाची एकूण किंमत रु. 63,50,000/- इतकी आहे.

            या प्रतिबंधित अन्न पदार्थांची वाहतूक व विक्रीच्या उद्देशाने साठवणूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी Kasa पोलीस ठाणे, ता. डहाणू, जि. पालघर येथे FIR क्र. 188/2026, दिनांक 03 ऑक्टोबर 2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            या प्रकरणी BNS कलम 123, 223, 274, 275, 3(5) तसेच Food Safety and Standards Act, 2006 मधील कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(e), 30(2)(a) सह कलम 59 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

            या प्रकरणातील प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री तसेच त्यामागील संघटित स्वरूपाचा तपास करण्यासाठी पोलिसांना लेखी निर्देश देण्यात आले आहेत.

            तसेच या प्रकरणामध्ये MCOCA लागू होतो किंवा नाही, याबाबत तपास करून मा.अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी दि.12 जून 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

3. ठाणे झोन-07 मधील कारवाई

दि.02 ऑक्टोबर 2026 रोजी ठाणे झोन-07 अंतर्गत प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणात श्री. विनय शर्मा, रा. सोनारपाडा, डोंबिवली पूर्व, यांच्याविरुद्ध FIR क्र. 500/2026 दाखल असून, या प्रकरणातील आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे मोहम्मद रफिक रती खान, वय 31 वर्षे, यास त्याच प्रकरणात अटक करण्यात आली.

            या कारवाईमध्ये रु. 84,28,020/- किमतीचे प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच रु. 20,00,000/- किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. त्यामुळे या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्न पदार्थ व वाहनाची एकूण किंमत रु.1,04,28,020/- इतकी आहे.

तसेच FIR क्र. 500/2026 मधील यापूर्वीच्या कारवाईसह जप्तीची एकूण किंमत रु.1,14,13,580/- इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

            या प्रकरणी प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाणे येथे FIR क्र. 500/2026, दि. 29 सप्टेंबर 2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी BNS कलम 123, 223, 274, 275 तसेच Food Safety and Standards Act, 2006 मधील कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(e), 30(2)(a), 3(1)(zz)(iv) सह कलम 59 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

            या प्रकरणामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री तसेच त्यामागील संघटित स्वरूपाचा तपास करण्यासाठी पोलिसांना लेखी निर्देश देण्यात आले असून, MCOCA लागू होतो किंवा नाही, याबाबत तपास करून मा.अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्या दि.12 जून 2026 रोजीच्या आदेशानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कारवाईतील अधिकारी

ठाणे झोन-10 : ही कारवाई FSO श्रीमती K. Y. Chiplunkar यांच्या नेतृत्वाखाली श्री. A. V. Kandelkar यांच्या सहकार्याने, सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. योगेश ढाणे व सह आयुक्त (अन्न) डॉ. सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईस गुन्हे शाखेचे PSI श्री. शिवाजी झांजुर्णे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

            पालघर झोन-01 : ही कारवाई FSO श्री. P. S. Kachave यांच्या नेतृत्वाखाली, श्री. U. R. Kavle, FSO (IB), श्री. M. Jadhav, FSO (IB) व श्री. Bade, FSO (IB) यांच्या सहकार्याने करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न), झोन-01, श्री. Pravin Surywanshi यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सह आयुक्त (अन्न) डॉ. सचिन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

            ठाणे झोन-07 : ही कारवाई FSO श्री. M. D. Kodag यांनी कल्याण गुन्हे शाखेच्या सहकार्याने केली. ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. P. M. Deshmukh यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सह आयुक्त (अन्न) डॉ. सचिन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

एकूण जप्ती

            ठाणे झोन-10, पालघर झोन-01 आणि ठाणे झोन-07 येथे करण्यात आलेल्या वरील कारवायांमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ व वाहने मिळून एकूण अंदाजे रु. 2 कोटी 69 लाख 29 हजार 860/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

            महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या पान मसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम अन्न पदार्थांची अवैध वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाची कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यापुढेही विशेष मोहिमा व कठोर कारवाई सातत्याने करण्यात येणार आहे.

 

00000000000

 


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन