एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2026-27 क्षेत्र विस्तार कार्यक्रम नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे
ठाणे,दि.01(जिमाका) : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये नवीन उती संवर्धन (Tissue Culture Lab) प्रयोगशाळा
स्थापन करणे या बाबींचा समावेश आहे.
सार्वजनिक क्षेत्र - राज्यातील कृषी विद्यापिठांतर्गत तसेच
इतर शासन अंगीकृत संस्था यांना नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रकल्प
मुल्याच्या 100 टक्के (जास्तीत जास्त रुपये 250.00 लाख) इतके अनुदान उपलब्ध करुन देण्यात
येते. प्रयोगशाळेने उपलब्ध निर्मिती तंत्राआधारे त्यांना मान्यता असलेल्या पिकांची
कमीतकमी 25.00 लाख रोपे उत्पादन करणे आवश्यक आहे. ज्या संस्थाकडे आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ
उपलब्ध आहे. अशाच सार्वजनिक क्षेत्रातील संस्थाना नवीन उतीसंवर्धन प्रयोगशाळा मंजुर
करण्यात येईल.
खाजगी क्षेत्र - खाजगी क्षेत्रातील नवीन उती संवर्धन
प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी, 40 टक्के प्रकल्प मुल्याच्या (जास्तीत जास्त रुपये 100.00
लाख) प्रती प्रयोगशाळा अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल. सदरचा प्रकल्प हा बँक कर्जाशी
निगडीत असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळेने उपलब्ध निर्मिती तंत्राआधारे त्यांना मान्यता
असलेल्या पिकांची कमीतकमी 25.00 लाख रोपे उत्पादन करणे आवश्यक आहे.
उतीसंवर्धन
प्रयोगशाळेला जैवतंत्रज्ञान विभागाच्या मानके व निकषानुसार अनुदान मिळाल्यापासुन 18
महिन्यांच्या आत मानांकन प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक राहील.
या घटकांची
अनुदान मर्यादा अनुदान पुढीलप्रमाणे आहे.
लाभार्थी - सार्वजनिक उपक्रम (कृषी विद्यापिठे व
सार्वजनिक संस्था / शासकीय प्रक्षेत्र), प्रकल्प खर्च - रू. २५०.०० लाखाच्या मर्यादेत, अनुदानाची मर्यादा
- प्रकल्प खर्चाच्या १०० टक्के.
खाजगी क्षेत्र - खाजगी क्षेत्र, प्रकल्प खर्च - रु.१००.०० लाखांच्या मर्यादित, अनुदानाची मर्यादा
- प्रकल्प खचांच्या 40 टक्के.
तरी, सर्व
संबंधितांना आवाहन करण्यात येते की, नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्याकरिता
अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली
अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क
साधावा, असे कृषी आयुक्त पुणे संचालक फलोत्पादन जिवन बुंदे यांनी कळविले आहे.
000000000
Comments
Post a Comment