बार्टी, समतादूत प्रकल्प मार्फत ठाणे जिल्ह्यात साजरा होणार सेवा संकल्प अभियान 2026
ठाणे,दि.06(जिमाका)
:- डॉ. बाबासाहेब
आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, यांच्या मार्फत आपल्या देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीस २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच त्यांच्या
कार्यकाळात ‘सेवा परमोधर्म’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या सेवा
पोहचविण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ दि.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत राबविल्या जात आहे. संपूर्ण
उपक्रमा मध्ये सामाजिक न्याय विभाग मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना माहिती देणे, वृक्षारोपण,
लाभार्थी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मनोगत घेणे, बार्टीच्या विविध उपक्रम माहिती वृद्धाश्रम
भेट, व्यसनमुक्ती बाबत माहिती देणे अशा प्रकारे उपक्रम राबविले जात असून जास्तीत जास्त
विद्यार्थी, नागरिकांना माहिती दिल्या जात आहे.
सदर उपक्रम समाजकल्याण
आयुक्त तथा महासंचालक दीपा मुधोळ मुंडे, निबंधक
डॉ. सुचिता शिंदे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शन खाली राबविला जात
आहे, अशी माहिती बार्टी प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांनी दिली आहे.
00000000000
.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment