जिल्हा गुंतवणूक परिषद 2026 अपरिहार्य कारणास्तव स्थगित

 


ठाणे,दि.७(जिमाका): शासनाच्या उद्योग विभागाशी संलग्न विभागांच्या सहाय्याने जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे यांच्यामार्फत महाराष्ट्रातील गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्याकरिता गुंतवणूक आकर्षित करणे, निर्यातवृद्धी तसेच औद्योगिक विकासाकरिता जिल्हा गुंतवणूक परिषद 2026 च्या कार्यशाळेचे आयोजन दि. 09 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात आले होते.

सद्यःस्थितीत काही अपरिहार्य कारणास्तव ही  कार्यशाळा स्थगित करण्यात आली असून कार्यशाळेचा सुधारित कार्यक्रम नव्याने कळविण्यात येईल, असे उप आयुक्त (उद्योग व सेवा), जिल्हा उद्योग केंद्र, ठाणे सोनाली देवरे यांच्यावतीने कळविण्यात येत आहे.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन