उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मीरा भाईंदर: दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू; पसंतीच्या क्रमांकासाठी 23 ऑक्टोबरपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ
ठाणे,दि.26(जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मीरा भाईंदर येथे ‘वाहन’
(VAHAN) या संगणकीय प्रणालीवर परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी सध्या
अमलात असलेली ‘MH58-E’ मालिका लवकरच संपुष्टात येत असून, त्यानंतर तात्काळ नवीन ‘MH58-F’ मालिका सुरू
करण्यात येणार आहे.
सदर नवीन मालिकेतील आकर्षक व
पसंतीचे नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी शासकीय नियमांनुसार विहित शुल्क आकारून
दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ पासून अर्ज स्वीकारण्यात
येत आहेत. तरी इच्छुक वाहनधारकांनी अटी व शर्तींच्या अधीन राहून आपले पसंतीचे
क्रमांक आरक्षित करून घ्यावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद
नलवडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000000
Comments
Post a Comment