सेवा संकल्प अभियाना अंतर्गत 61 महावितरण कर्मचाऱ्यांचे रक्तदान
ठाणे,दि.9(जिमाका)
:- केंद्र
आणि राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प आणि सेवा सेतू
अभियानांतर्गत महावितरणच्या कल्याण मंडळ कार्यालय -1 च्या वतीने आयोजित रक्तदान
शिबीरात 61 कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.
महावितरणच्या आनंद नगर
उपविभागीय कार्यालय आणि कल्याण पूर्व विभागात या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात
आले होते. चिदानंद रुग्णालय व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्व यांचे कल्याण पूर्व
विभागात तर ज्युपीटर हॉस्पिटल यांचे डोंबिवली विभागासाठी सहकार्य मिळाले.
रक्तदान शिबीर यशस्वी
होण्यासाठी अधिक्षक अभियंता रविंद्र आव्हाड, कार्यकारी अभियंता
जगदीश बोडके, अण्णासाहेब काळे यांनी मेहनत घेतली, असे कोकण प्रादेशिक
कार्यालय, कल्याण उपमुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले आहे.
00000000000

Comments
Post a Comment