प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २४ व्या हप्त्याचे दि. ३० ऑक्टोबर रोजी वितरण
ठाणे,दि.२8 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दिला जाणारा २४ वा हप्ता येत्या शुक्रवारी, दि.
३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून ऑनलाइन प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येणार
आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत, बनासकांठा, गुजरात येथे हा कार्यक्रम
पार पडणार असून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका बटणाच्या क्लिकवर देशभरातील
पात्र शेतकऱ्यांना आधार संलग्न बैंक खात्यात प्रत्येकी रु. २००० थेट जमा करण्यात येणार
आहेत.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देशभरात करण्यात येणार असून राज्यातील व जिल्ह्यातील
पात्र शेतकरी कुटुंबांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. याअनुषंगाने ठाणे जिल्ह्यातही
विविध स्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर, कृषी विज्ञान केंद्र, कृषी उत्पन्न बाजार
समिती, विविध शासकीय कार्यालये, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादन कंपन्या (FPCs), शेतकरी
उत्पादक संघटना (FPOs) तसेच सहकारी पतसंस्था (PACS) येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
येणार आहे.
सदर कार्यक्रमामध्ये कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक
शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून कार्यक्रमाचे थेट वेबकास्ट पाहण्याची व्यवस्था
करण्यात येणार आहे.
सदर समारंभामध्ये http://pmindiawebcast.nic.in या लिंक चा वापर करून परिसरातील
शेतकरी सहभागी होऊ शकणार आहेत.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वरील लिंक चा वापर करून सदर कार्यक्रमामध्ये
सहभागी व्हावे, असे आवाहन पी. एम. किसान योजनेचे जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक
कृषी अधिकारी, ठाणे रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
0000000000
Comments
Post a Comment