क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले २०० वे जयंती वर्ष उत्साहात होणार साजरे विविध प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन

 



 

 


 

ठाणे,दि.२७ (जिमाका): सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे २०० वे जयंती वर्ष राज्यभरात विविध प्रबोधनात्मक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. ११ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२७ हा कालावधी 'क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंती वर्ष' म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने १ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे.

यासंदर्भातील माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक अपूर्वा अनिल कारंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या जयंती वर्षानिमित्त वर्षभरात सर्व क्षेत्रीय कार्यालये, अधिनस्त शासकीय संस्था, आश्रमशाळा, नामांकित स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय वसतिगृहांमध्ये विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे, प्रभातफेरी काढणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक विचार रुजवण्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन केले जाईल.

महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर सर्व स्तरांवर पोहोचवण्यासाठी विविध संस्था व कार्यालयांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात

000000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन