सेवा संकल्प अभियानांतर्गत आंबाडी येथे विशेष महसूल शिबीर उत्साहात संपन्न

 



        ठाणे,दि.14(जिमाका):  महाराष्ट्र शासनाच्या "सेवा संकल्प" अभियानांतर्गत, ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, भिवंडीचे प्रांताधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजीत खोले यांच्या विशेष पुढाकारातून आंबाडी येथे एका भव्य विशेष शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा आणि महसूल विभागाशी संबंधित सेवांचा थेट व जलद लाभ मिळावा, या मुख्य उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराच्या माध्यमातून नागरिकांना विविध दाखले, महसुली कागदपत्रे आणि शासकीय योजनांचे अर्ज एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले, ज्यामुळे स्थानिक ग्रामस्थांची होणारी धावपळ थांबून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या अर्जांवर तत्परतेने कार्यवाही केली. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशासनाच्या या लोकाभिमुख पाऊलाचे मनापासून कौतुक केले. शासनाच्या योजना थेट जनतेच्या दारात पोहोचवून पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याच्या दिशेने हे शिबीर अत्यंत महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद ठरले आहे.

000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन