महावितरण मध्ये सन्मान सौदामिनीचा
ठाणे,दि.19(जिमाका)
: महावितरण कंपनीत विविध पदांवर कार्यरत महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामाचे
कौतुक करण्यासाठी कल्याण परिमंडळात सन्मान सौदामिनीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले होते.
तेजश्री इमारतीत आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य अभियंता
रवींद्र आव्हाड उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना
पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
महावितरण कंपनीत कार्यरत महिला अधिकारी आणि कर्मचारी या पुरूषांच्या बरोबरीने काम
करत असल्याने देशातील आघाडीची वीज वितरण कंपनी झाली आहे, असे गौरवोद्गार प्रभारी मुख्य
अभियंता रविंद्र आव्हाड यांनी काढले. यावेळी काही महिला कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त
केले, असे कोकण प्रादेशिक कार्यालय कल्याणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी कळविले
आहे.
00000000000

Comments
Post a Comment