शेतकऱ्यांनी आंबा, काजू, केळी, नारळ व सुपारी या फळपिकांचा विमा उतरवावा - विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले
ठाणे,दि.06(जिमाका) :- येत्या आंबिया बहारामध्ये विविध हवामान धोक्यामुळे
फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता कृषि
विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबविण्यात येत
आहे. सन 2026-27 आंबिया बहाराकरीता योजनेमध्ये सहभागाची प्रक्रिया सुरु झाली आहे.
अधिकाधिक शेतकऱ्यांनी निर्धारीत केलेल्या कालावधीत योजनेमध्ये सहभागी होऊन कमी
किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा, अवेळी पाऊस या
हवामान धोक्यापासून फळबागांचे संरक्षण करा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे शिवाजी आमले यांनी केले आहे.
योजनेची वैशिष्टये : कर्जदार शेतकरी व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील
सहभाग ऐच्छिक असेल. कर्जदार शेतकरी यांना योजनेत सहभागी न होण्याबाबतचे प्रमाणपत्र
हंगामाच्या आधी किंवा योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम दिनांकाच्या सात दिवसाच्या
अगोदर देणे गरजेचे आहे. खातेदार शेतकरी व्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे
शेतकरी यांनाही सदर योजना लागू राहील. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकांसाठी 4
हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करण्याची मुभा. कोकण विभागाकरीता प्रति शेतकरी सहभागासाठी एका फळपिकाखालील कमीत कमी
उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे (0.10 हे.). सदर फळपीक
विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना डिजिटल पीक सर्वेक्षण (Digital Crop Survey (DCS) अंतर्गत पीकांची नोंद करणे बंधनकारक राहील. सदर फळपीक विमा योजनेत सहभागी
होणाऱ्या शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी बंधनकारक आहे. विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी
आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी
लिंक असावे. एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग व आंबिया बहारापैकी
कोणत्याही एकाच बहाराकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. कोकण विभागाकरिता आंबिया बहारामध्ये - केळी,
आंबा, काजू, नारळ, सुपारी. केवळ उत्पादनक्षम फळबागानाच विमा योजना लागू होईल. (आंबा,
काजू, सुपारी - 5 वर्षे ; नारळ-7 वर्ष ). फळबाग लागवडीची Geo Tagging छायाचित्रे
विमा पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक राहील.
ही योजना ठाणे,
सिंधुदूर्ग व रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी व पालघर जिल्ह्यामध्ये इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड
यांचेमार्फत राबविण्यात
येत आहे. फळपिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत केळी, नारळ,
सुपारी पिकाकरीता दि. 31 ऑक्टोबर 2026, काजू व आंबा पिकाकरीता दि. 30 नोव्हेंबर 2026 आहे.
विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दर (रु./हेक्टर) :
ठाणे जिल्हा - आंबा फळपिक - विमा संरक्षित रक्कम - 1,70,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 8500/- ठाणे जिल्हा
- काजू फळपिक - विमा संरक्षित रक्कम - 1,20,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 6000/-
पालघर जिल्हा- आंबा फळपिक
- विमा संरक्षित रक्कम - 1,70,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 8500/- पालघर
जिल्हा- काजू फळपिक - विमा संरक्षित रक्कम - 1,20,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 6000/-
पालघर जिल्हा- केळी फळपिक
- विमा संरक्षित रक्कम - 1,70,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 8500/-
पालघर जिल्हा- नारळ फळपिक
- विमा संरक्षित रक्कम - 1,70,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 8500/-
पालघर जिल्हा- सुपारी
फळपिक - विमा संरक्षित रक्कम - 1,00,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 5000/-
रायगड जिल्हा- आंबा फळपिक
- विमा संरक्षित रक्कम - 1,70,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 8500/-
रायगड जिल्हा- काजू फळपिक
- विमा संरक्षित रक्कम - 1,20,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 4800/-
रायगड जिल्हा- नारळ फळपिक
- विमा संरक्षित रक्कम - 1,70,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 8500/-
रायगड जिल्हा- सुपारी
फळपिक - विमा संरक्षित रक्कम - 1,00,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 5000/-
रत्नागिरी जिल्हा - आंबा फळपिक -विमा संरक्षित रक्कम-1,70,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा- 8500/-
रत्नागिरी जिल्हा- काजू फळपिक
- विमा संरक्षित रक्कम- 1,20,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा- 6000/-
रत्नागिरी जिल्हा- नारळ फळपिक
- विमा संरक्षित रक्कम-1,70,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा- 8500/-
रत्नागिरी जिल्हा-सुपारी
फळपिक - विमा संरक्षित रक्कम - 1,00,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा- 5000/-
सिंधुदुर्ग जिल्हा - आंबा फळपिक -विमा संरक्षित रक्कम-1,70,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा- 8500/-
सिंधुदुर्ग जिल्हा- काजू फळपिक - विमा संरक्षित रक्कम- 1,20,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा- 6000/-
सिंधुदुर्ग जिल्हा- केळी फळपिक - विमा संरक्षित रक्कम - 1,70,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा - 8500/-
सिंधुदुर्ग जिल्हा- नारळ फळपिक - विमा संरक्षित रक्कम-1,70,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा- 8500/-
सिंधुदुर्ग जिल्हा-सुपारी
फळपिक - विमा संरक्षित रक्कम - 1,00,000/-, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा- 5000/-
फळपिकनिहाय हवामान धोके व संरक्षण कालावधी :
केळी फळपीक - समाविष्ट धोके
- कमी तापमान, विमा
संरक्षण कालावधी - 01 नोव्हेंबर
ते 28 फेब्रुवारी
समाविष्ट धोके - वेगाचा
वारा, विमा संरक्षण कालावधी - 01 मार्च ते 31 जुलै
समाविष्ट धोके - जास्त
तापमान, विमा संरक्षण कालावधी - 01
एप्रिल ते 30 एप्रिल
समाविष्ट धोके - जास्त तापमान, विमा संरक्षण कालावधी - 01
मे ते 31 मे
समाविष्ट धोके – गारपीट(ऐच्छिक), विमा संरक्षण कालावधी - 01
डिसेंबर ते 31 मे
काजू फळपीक - समाविष्ट धोके - अवेळी पाऊस, विमा संरक्षण कालावधी - 01
डिसेंबर ते 28 फेब्रुवारी
समाविष्ट धोके - कमी तापमान,
विमा संरक्षण कालावधी - 01 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी समाविष्ट धोके - जास्त
तापमान, विमा संरक्षण कालावधी - 01
एप्रिल ते 30 एप्रिल
समाविष्ट धोके - गारपीट, विमा संरक्षण कालावधी - 01
डिसेंबर ते 31 मे
आंबा फळपीक - समाविष्ट धोके - अवेळी पाऊस, विमा संरक्षण कालावधी - 01
डिसेंबर ते 31 मार्च
समाविष्ट धोके - अवेळी पाऊस, विमा संरक्षण कालावधी - 01
एप्रिल ते 31 मे
समाविष्ट
धोके - कमी तापमान, विमा
संरक्षण कालावधी - 01 जानेवारी
ते 10 मार्च
समाविष्ट
धोके - जास्त तापमान, विमा
संरक्षण कालावधी - 01 मार्च
ते 31 मे
समाविष्ट
धोके - वेगाचा वारा, विमा
संरक्षण कालावधी - 16 एप्रिल मार्च
ते 15 मे
समाविष्ट
धोके - गारपीट(ऐच्छिक), विमा
संरक्षण कालावधी - 01 डिसेंबर
ते 31 मे
नारळ फळपीक - समाविष्ट धोके - वेगाचा वारा, विमा संरक्षण कालावधी - 1
नोव्हेंबर ते 31 मे
समाविष्ट
धोके - जास्त तापमान, विमा
संरक्षण कालावधी - 01 जानेवारी ते 31 मार्च
समाविष्ट
धोके-जास्त पाऊस व जास्त जार्दता, विमा
संरक्षण कालावधी-1 जून ते 30 सप्टेंबर
समाविष्ट
धोके - कमी पाऊस, विमा
संरक्षण कालावधी - 1 जून ते 30 सप्टेंबर
समाविष्ट
धोके - गारपीट(ऐच्छिक), विमा
संरक्षण कालावधी - 01 डिसेंबर
ते 31 मे
सुपारी फळपीक - समाविष्ट धोके
- वेगाचा वारा, विमा
संरक्षण कालावधी - 1 नोव्हेंबर ते 31 मे
समाविष्ट
धोके - जास्त तापमान, विमा
संरक्षण कालावधी - 01 जानेवारी ते 31 मार्च
समाविष्ट
धोके-जास्त पाऊस व जास्त जार्दता, विमा
संरक्षण कालावधी-1 जून ते 30 सप्टेंबर
समाविष्ट
धोके - कमी पाऊस, विमा
संरक्षण कालावधी - 1 जून ते 30 सप्टेंबर
समाविष्ट
धोके - गारपीट(ऐच्छिक), विमा
संरक्षण कालावधी - 01 डिसेंबर
ते 31 मे
वरील हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास सदर
योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पाअंतर्गत स्थापन
केलेल्या हवामान केंद्रात नोंदल्या गेलेल्या हवामान तपशिलानुसार विमा येाजनेत भाग
घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई अदा करेल.
योजनेत सहभाग घेण्यासाठी आवश्यक बाबी -
1.अॅग्रीस्टॅक नोंदणी, 2) आधार कार्ड, 3) बँक खाते
तपशील, 4) जमीन धारणा उतारा (7/12), 5) Geo Tag फोटो, 6) ई पीक पाहणी/DCS असणे 100% बंधनकारक आहे. अन्यथा विमा
प्रस्ताव रद्द केला जाऊ शकतो.
शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच
त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई
सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा.
आंबिया बहारातील अधिसूचित फळपिकाचे हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम, संरक्षण
कालावधी, विमा हप्ता इत्यादी बाबतीत सविस्तर माहितीचा दि.27 जून 2026 चा शासन निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या https:// www.maharashtra.gov.in व कृषी
विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेत
स्थळावर उपलब्ध आहे. तसेच ई सेवा केंद्र, व
बँकस्तरावरही याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाने सहभागी
विमा कंपन्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे
कार्यालय किवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कोकण विभाग ठाणे
विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले यांनी कळविले आहे.
0000000000000
Comments
Post a Comment