प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना ठाणे जिल्ह्यात प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत ३६ हजार ७८४ अर्ज प्राप्त व १४ हजार ९०० अर्ज पात्र

 


        पारंपारिक कारागीर व हस्तकला व्यवसायिकांना कौशल्य विकास, आधुनिक साधने, प्रशिक्षण, कर्ज सुविधा व बाजारपेठेशी जोडणी उपलब्ध करून देणे, हा "प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान" या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

          ठाणे जिल्ह्यात दि.१७ सप्टेंबर २०२३ पासून प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यात येत आहे.    

          जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४३१ ग्रामपंचायती तसेच १० यु. एल. बी. (महानगरपालिका, नगर पालिका व नगर परिषद) यांच्या माध्यमातून योजनेची अंमलबाजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सुतार, सोनार, लोहार, मोची, गवंडी, मूर्तिकार, धोबी, शिंपी, कुंभार, हार तुरे तयार करणारे, नभिक, विणकर, चटई व झाडू बनविणारे, दोऱ्या वळणारे, होड्या बांधणारे, मासेमारीचे जाळे विणणारे, कुलूप तयार करणारे व पारंपरिक खेळणी बनवणारे अशा १८ पारंपारिक व्यवसायांचा समावेश आहे.

          ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ३६ हजार ७८४ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १४ हजार ९०० अर्ज जिल्हा समितीने पात्र ठरवून शिफारस शिफारस करण्यात आली आहे. तसेच एम.एस.एम.ई. विभागामार्फत १ हजार ३०३ अर्ज प्राथमिक प्रशिक्षणासाठी पुढे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ९०४ लाभार्थ्यांचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

          या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षणासोबतच दुलकीट प्रोत्साहन, कर्जसुविधा व डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन दिले जाते. अधिकृत माहितीनुसार प्रशिक्षण काळात दररोज रुपये ५००/- प्रशिक्षण भत्ता आणि कौशल्य पडताळणीनंतर रुपये १५,०००/- पर्यंत टूलकिट प्रोत्साहनाची तरतूद आहे. तसेच तारणमुक्त कर्जसुविधा उपलब्ध आहे. लाभर्थ्यांना ५ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येऊन प्रथम टप्प्यात ४% व्याज दराने रक्कम रुपये एक लाख कर्ज दिले जाते. व या कर्जाची १८ महिन्यात पूर्ण परतफेड केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात लाभर्थ्यांना १५ दिवसाचे प्रशिक्षण देण्यात येऊन रक्कम रुपये दोन लाख विनातारण ४% व्याज दराने कर्ज दिले जाते. तसेच लाभार्थ्यांचे ब्रॅण्डिंग व पुढील प्रशिक्षण व इम्पोर्ट एक्सपोर्ट सुविधा देखील त्यांना दिल्या जाणार आहेत. तसेच लाभर्थ्यांना समूह विकास योजनेचा लाभही देऊन क्लस्टर करण्याची शासनाची योजना आहे.

          ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत १५८ लाभर्थ्यांना कर्ज मंजूर झाले असून त्यापैकी १३६ लाभर्थ्यांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. तसेच ३१८ लाभर्थ्यांना टुलकीटचे वाटप करण्यात आले आहे.

          मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या लाभार्थी मेळाव्यात योजनेतील लाभर्थ्यांना विविध लाभांचे वितरण, मार्गदर्शन व योजनांच्या पुढील टप्प्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. पारंपारिक कारागिरांच्या कौशल्याला आधुनिक व तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचे उत्पन्न व व्यवसायाच्या संधी वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.

 

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

                       ठाणे

0000000

 


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन