बार्टी, समतादूत मार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथे सेवा संकल्प अभियान निमित्त व्यसन मुक्ती जनजागृती व शिष्यवृत्ती माहिती पर कार्यक्रम
ठाणे,दि.9(जिमाका) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था
(बार्टी) पुणे, यांच्या मार्फत
आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील
कारकिर्दीस 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच त्यांच्या कार्यकाळात
"सेवा परमोधर्म " या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकां पर्यंत शासनाच्या
सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने "सेवा संकल्प अभियान उपक्रम
मध्ये सामाजिक न्याय विभाग मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना माहिती व व्यसन मुक्ती
जनजागृती पर कार्यक्रम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथे घेण्यात
आलाय, यावेळी बार्टीच्या विविध उपक्रम माहिती देत प्रकल्प अधिकारी मेघा पवार व
समतादूत नितीन वाघमारे, शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी व्यसन मुक्ती पर शपथ घेतली
असून विद्यार्थी यांना व्यसना पासून कसे लांब रहाता येईल याबाबत मार्गदर्शन
केले.विद्यार्थी यांनी खूप चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय.
सदर उपक्रम
समाजकल्याण आयुक्त तथा
महासंचालक श्रीमती दीपा
मुधोळ मुंडे , निबंधक डॉ. सुचिता शिंदे, विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या
मार्गदर्शन खाली राबविला जात आहे.
00000000000
.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment