ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी 'एकमेव' सुवर्णसंधी एकरकमी परतावा (OTS) योजनेत व्याजात 50 टक्के सवलत

 



 


 

ठाणे,दि.9(जिमाका) :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या जिल्हा कार्यालय, ठाणे मार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्जे वितरित करण्यात आली आहेत. या कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात आली होती; परंतु मुदत संपूनही बऱ्याच लाभार्थ्यांनी महामंडळाकडे शिल्लक रकमेची परतफेड केलेली नाही.

थकीत कर्जाच्या वसुलीसाठी महामंडळाकडून सर्व वैधानिक प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, महामंडळाच्या थकीत लाभार्थ्यांसाठी एककरकमी परतावा (OTS) योजना नव्याने राबविण्यात येत आहे. या सुधारित योजनेंतर्गत, संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकबाकीच्या व्याज रकमेमध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्व संबंधित थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपली थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरक्कमी भरून आपले कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त होऊन भविष्यात होणारी संभाव्य कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, ठाणे यांनी केले आहे.

अधिक माहिती व संपर्कासाठी पत्ता : श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि., डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला, दत्तवाडी, खारेगाव रोड, कळवा (पश्चिम), ठाणे - ४००६०५. दूरध्वनी : ०२२-२०८१३६२५, ई-मेल: dmobcthane@gmail.com.

00000000000


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन