जिल्ह्यातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी आर्थिक मदत प्रकरणांसाठी नोंदणी करावी

ठाणे,दि.28(जिमाका):- जिल्ह्यातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी https://www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन घेणे अनिवार्य आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) कळविले आहे.

नोंदणी केल्याशिवाय आपल्याला ओळखपत्र, पाल्यांच्या स्कॉलरशिप अथवा कोणत्याही प्रकारची आर्थिक मदतीची प्रकरणे स्वीकारली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

महापोर्टलवर आपली नोंदणी करण्यासाठी ओळखपत्र, डिस्चार्ज बुक, आधार कार्ड, पी.पी.ओ. (PPO), पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, ई.सी.एच.एस.कार्ड. ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट