प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे ऑटो रिक्षा वाहनांकरिता नवीन मालिका सुरु

ठाणे,दि.30(जिमाका):- प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे VAHAN या संगणक प्रणालीवर परिवहन संवर्गांतील ऑटो रिक्षा वाहनांकरिता सध्या सुरु असलेली MH-04-LX मालिका संपल्यानंतर तात्काळ नवीन मालिका MH-04-MT सुरु करण्यात येणार आहे.

अटींना अधिन राहून आकर्षक व पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांकासाठी दि.01 जुलै 2025 पासून अर्ज स्विकारुन पसंतीचे व आकर्षक क्रमांक विहीत शुल्क आकारुन आरक्षित करण्यात येतील याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, असे ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न