केंद्र शासनाने Fertilzer sale application system (FSAS) या mobile base app मधून QR code द्वारे शेतकऱ्यांना खतांचे बुकींग करता येणार
ठाणे दि.27(जिमाका) :- केंद्र शासनाकडून अनुदानित खतांच्या वितरणासाठी National Fertilizer Sale
Framework अंतर्गत Fertilzer sale application system (FSAS) या अॅपद्वारे खत
खरेदी प्रणाली तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. या आराखड्या अंतर्गत FSAS हे App
केंद्र शासनाने तयार केले असून या App मधून शेतकऱ्यांना खतांची चुकीग करता येणार
आहे.
राज्यात
कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग
राबविला जाणार आहे. त्यासाठी शेतकरी व खत विक्रेते यांना याबाबत माहिती होण्यासाठी
व त्याप्रमाणे कार्यवाही होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे आवश्यक आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत
विक्री आराखडा (National fertilizer sale framework) प्रकल्पांतर्गत
IFMS व Agristack प्रणालीचे
integration
करण्यात येत आहे.
·
केंद्र शासनाने Fertilzer
sale application system (FSAS) हे mobile base App तयार केले आहे. या mobile base
app मधून QR code द्वारे शेतकऱ्यांना खतांचे
बुकींग करता येणार आहे.
·
शेतकऱ्यांनी QR code द्वारे खत बुक केल्यानंतर
QR
code तीन दिवस वैध राहणार असून शेतकरी त्यांच्या सोयीनुसार त्यांनी
निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जाऊन खत खरेदी करू शकतात.
·
खताचे online booking केल्याने
रांगेत उभे राहावे लागणार नाही.
·
आवश्यक खताचे booking केल्यामुळे इतर अनावश्यक खते घेण्याची सक्ती दुकानदाराकडून होणार नाही. त्यामुळे
खत विक्री मध्ये सुलभता व पारदर्शकता येईल.
·
सद्यस्थितीत दुकानांमध्ये खत उपलब्ध
आहे किंवा नाही हे समजत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास होत असल्याचे दिसून येते, वरील प्रणालीमुळे या गोष्टी टाळता येणार आहेत.
·
या वितरण प्रणालीची केंद्र शासनाच्या टीम
ने पुणे जिल्ह्यातील
अष्टापुर, ता. हवेली येथे यशस्वीपणे चाचणी घेतली आहे.
·
राज्यातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची
केंद्र शासनाने निवड केली असून पथदर्शी प्रकल्प म्हणून खरीप हंगामात Fertilizer
sale application system या प्रणालीद्वारे खत विक्रीची सुरुवात
करण्यात येणार आहे, असे कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे कृषी संचालक (नि.व
गु.नि.) सुनील बोरकर यांनी कळविले आहे.
0000000000
Comments
Post a Comment