केंद्रीय मोटार वाहन (सहावी सुधारणा) नियम, 2026 अन्वये केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांबाबत जनसामान्यांसाठी

 



ठाणे,दि.30(जिमाका) :- भारत सरकार, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन (सहावी सुधारणा) नियम, 2026 अन्वये केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम ५२, ६२, १७४, १७६, १७७, १८१, १८२१८9 तसेच Form-38 मध्ये महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. सदर सुधारणा अधिसूचना क्रमांक G.S.R. 349(E) अन्वये दि.08 मे 2026 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाल्या असून त्याच दिनांकापासून अंमलात आलेल्या आहेत.

सदर सुधारणांमधील प्रमुख बदल पुढीलप्रमाणे आहेत :-

(अ) ज्या कार्यक्षेत्रात Automated Testing Station (ATS) कार्यान्वित आहे, त्या क्षेत्रातील Light Motor Vehicle वर्गातील वाहनांची फिटनेस तपासणी केवळ ATS मार्फतच करणे अनिवार्य.

(ब) नवीन Non-Transport Vehicle साठी नोंदणीच्या वेळी स्वतंत्र Fitness Certificate आवश्यक नाही, नोंदणी दिनांकापासून 15 वर्षे वाहन फिट मानण्यात येईल व त्यानंतर प्रत्येक 5 वर्षांनी नूतनीकरण.

(क) फिटनेस तपासणीवेळी वाहनाचा किमान 10 सेकंदांचा Geo-Tagged व्हिडिओ Mobile Application द्वारे Capture व Upload करणे बंधनकारक.

(ड) ATS Slot Booking च्या वेळी Insurance Validity, Permit Validity व PUC Validity ची पडताळणी अनिवार्य.

(इ) वाहन 'Unfit' घोषित झाल्यापासून 180 दिवसांत 'Fit' न झाल्यास End of Life Vehicle (ELV) म्हणून वर्गीकरण.

(फ) सुधारित Form-38 चाच वापर करावा, Form-38A वगळण्यात आलेला आहे.

सदर नियम सुधारणा वाहन मालक, वाहनचालक व सर्वसामान्य नागरिकांशी थेट संबंधित असल्याने, त्यांना या बदलांची पूर्व माहिती होणे अत्यंत आवश्यक व हितकारक आहे, असे नवी मुंबई सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी कळविले आहे.

0000000000000

 


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी

79 व्या स्वातंत्र्यदिनासाठी राजशिष्टाचार जारी; ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय कार्यक्रम