एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन
ठाणे,दि.30(जिमाका):- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना
महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्हयांमध्ये राबविण्यात येत असून सन 2026-27
अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी रु.19.11 कोटी रक्कमेचा कार्यक्रम मंजूर आहे.
खालील नमूद केलेल्या घटकांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे महाडीबीटी पोर्टलवर (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin ) अर्ज करण्यासाठी
आव्हान करण्यात येत आहे.
बाब - लहान रोपवाटीका (0.40 ते 1 हे), आर्थिक मापदंड रु.-
20 लाख/हे., अर्थसहाय्य दर - रु.10.00 लाख
पर्यंत (खाजगी क्षेत्र).
बाब - मोठी रोपवाटीका
(1 ते 2 हे.), आर्थिक मापदंड रु.- 30 लाख/हे., अर्थसहाय्य दर - रु.24.00 लाख पर्यंत (खाजगी क्षेत्र).
फळपिके -
प्रति लाभार्थी क्षेत्रमर्यादा
- 2 हे. पर्यंत
बाब - स्ट्रॉबेरी,
ड्रॅगनफ्रुट,
पॅशन फ्रुट, किवी, द्राक्ष, खजूर (टिश्यू कल्चर), आर्थिक
मापदंड रु.- 2 लाख ते
6.75 लाख / हे., अर्थसहाय्य दर - रु.0.80 लाख ते रु.2.70 लाख प्रति हे.
बाब - केळी आणि अननस (सकर्स) -ठिबक सिंचनाशिवाय, आर्थिक मापदंड रु.- 1.10 लाख/हे.,
अर्थसहाय्य दर - रु.0.44 लाख प्रति हे. (दोन हप्त्यात).
बाब - केळी आणि अननस (टिश्यू कल्चर) - ठिबक
सिंचनाशिवाय , आर्थिक मापदंड रु.- 1.75 लाख/हे.,
अर्थसहाय्य दर - रु. 0.70 लाख प्रति हे. (दोन हप्त्यात).
बाब - अवोकॅडो - ठिबक सिंचनाशिवाय,
आर्थिक मापदंड रु.- 1.25लाख/हे., अर्थसहाय्य
दर - रु.0.50 लाख प्रति
हे. (दोन हप्त्यात).
बाब - पपई - ठिबक सिंचनाशिवाय, आर्थिक मापदंड रु.- 0.75 लाख/हे., अर्थसहाय्य दर - रु.0.30 लाख प्रति हे. (दोन हप्त्यात).
बाब - अळिंबी उत्पादन प्रकल्प, आर्थिक मापदंड रु.-
30 लाख/युनिट, अर्थसहाय्य दर - रु.12.00 लाख प्रति युनिट.
बाब - अळिंबी बीज उत्पादन केंद्र स्थापना करणे, आर्थिक मापदंड रु.-
20 लाख/युनिट, अर्थसहाय्य दर - रु.8.00 लाख प्रति युनिट.
बाब - कंपोस्ट मेकींग युनिट, आर्थिक मापदंड रु.-
30 लाख/युनिट, अर्थसहाय्य दर - रु.12.00 लाख प्रति युनिट.
बाब - कमी खर्चाचे अळिंबी उत्पादन प्रकल्प, आर्थिक मापदंड रु.-
2 लाख/युनिट, अर्थसहाय्य दर - रु.1.00 लाख प्रति युनिट 5युनिट/लाभार्थी.
बाब - सुटीफुले, दांडयाची फुले, कंदवर्गीय फुले, आर्थिक मापदंड रु.-
0.50 ते 2.50 लाख/हे.,
अर्थसहाय्य दर - रु.0.20 लाख प्रति हे..
बाब - बी
वर्गीय मसाले पिके, आर्थिक मापदंड रु.-
0.50 लाख/हे., अर्थसहाय्य दर - रु.0.20
लाख ते रु.1.00 लाख प्रति हे..
बाब - कंदवर्गीय मसाले व
बहुवर्षिय मसाला पिके, आर्थिक मापदंड रु.-
1 लाख/हे., अर्थसहाय्य दर - रु.0.40 लाख प्रति हे..
बाब - खर्चीक
सुगंधी वनस्पती (Tuberose, Geranium etc.), आर्थिक मापदंड रु.-
1.25 लाख/हे., अर्थसहाय्य
दर - रु.0.50 लाख प्रति
हे..
बाब - इतर
सुगंधी वनस्पती (Lemongrass, Citronella, etc.), आर्थिक मापदंड रु.-
0.50 लाख/हे., अर्थसहाय्य
दर - रु.0.20 लाख प्रति
हे. .
बाब - औषधी
वनस्पती (Shwet
Musali,Ashwagandha,Pippali etc.), आर्थिक
मापदंड रु.- 1.50 लाख/हे., अर्थसहाय्य दर - रु.0.60 लाख प्रति हे. .
बाब - जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन (आंबा, संत्रा, मोसंबी व
चिकु इ.) क्षेत्रमर्यादा - 2
हे. पर्यंत, आर्थिक मापदंड रु.0.60 लाख/हे., अर्थसहाय्य दर - रु.0.24 लाख प्रति हे. .
बाब - सामुहिक शेततळे, आर्थिक मापदंड रु.4.00 लाख/ युनिट, अर्थसहाय्य
दर - आकारमानुसार जास्तीत
जास्त रु.3.00 लाख/ युनिट.
बाब - वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण,
आर्थिक मापदंड रु. 1.50 लाख, अर्थसहाय्य दर-आकारमानुसार जास्तीत जास्त रु.0.75 लाख/ युनिट.
बाब - हरीतगृह (CCPH) व (OVPH), आर्थिक मापदंड रु.
- रु. 950 ते 1850/ चौ.मी. (500 चौ.मी. ते 4000 चौ.मी.पर्यंत), अर्थसहाय्य दर - खर्चाच्या 50 टक्के अर्थसहाय्य. क्षेत्रमर्यादा - जास्तीत जास्त 4000 चौ.मी./
लाभार्थी.
बाब - बांबू /
केबल पर्लिन स्ट्रक्चर,
आर्थिक मापदंड रु.- रु. 450 / चौ.मी, अर्थसहाय्य दर - खर्चाच्या 50 टक्के अर्थसहाय्य. क्षेत्रमर्यादा - जास्तीत जास्त 4000 चौ.मी./
लाभार्थी.
बाब - शेडनेटगृह ट्यूबुलर / रेक्टॅग्युलर
स्ट्रक्चर, आर्थिक
मापदंड रु.- रु .710/ चौ.मी, अर्थसहाय्य दर - खर्चाच्या 50 टक्के अर्थसहाय्य. क्षेत्रमर्यादा - जास्तीत जास्त 4000 चौ.मी./ लाभार्थी.
बाब - प्लास्टिक मल्चिंग/ जूट/ अॅग्रो टेक्सटाइल/ बायोडिग्रेडेबल आच्छादन,
आर्थिक मापदंड रु.- रु.40000/हे.,
अर्थसहाय्य दर - खर्चाच्या 50 टक्के अर्थसहाय्य क्षेत्रमर्यादा - जास्तीत जास्त 2 हे./लाभार्थी.
बाब - फळ पिकांकरिता फळांना/ फळांच्या घडांना कव्हर (Fruit Cover & Crop Cover), आर्थिक मापदंड रु.- रु.50000/हे., अर्थसहाय्य दर - खर्चाच्या 50 टक्के अर्थसहाय्य क्षेत्रमर्यादा - जास्तीत जास्त 2 हे./लाभार्थी.
बाब - तण नियंत्रक अच्छादन, आर्थिक मापदंड रु.-
रु.50/ चौ.मी., अर्थसहाय्य दर - खर्चाच्या 50 टक्के अर्थसहाय्य.
बाब - मधुमक्षिका वसाहत
व मधुमक्षिका
पेटी, आर्थिक मापदंड रु.- 4000/युनिट व 2000/वसाहत, अर्थसहाय्य दर - 40%, 50 कॉलनी/लाभार्थी.
बाब - मध
काढणी यंत्र, आर्थिक मापदंड रु.- 20,000/सेट, अर्थसहाय्य दर - 40%, 1 सेट/लाभार्थी.
बाब - ट्रॅक्टर 20(20 बी.एच.पी.) (2 डब्लू .डी. व 4 डब्लू .डी.), अर्थसहाय्य
दर - जास्तीत जास्त
रु.1.25 लाख/युनिट.
बाब - पॉवर
टिलर 8 अश्वशक्तीपेक्षा कमी व 8 अश्वशक्तीपेक्षा
जास्त, अर्थसहाय्य दर - कमीत कमी रु.0.50 लाख व जास्तीत जास्त रु.1.00.
बाब - मॅन्युअल
स्पेअर नॅपसॅक/फ्रुट स्प्रेअर पॉवर नॅपसॅक 8-12
ते 16 लीटर पेक्षा जास्त क्षमता, अर्थसहाय्य
दर - कमीत कमी रु. 0.01 लाख ते रु.0.10 लाख / युनिट.
बाब - पॉवर
नॅपसॅक स्प्रेअर/पॉवर संचलित, तैवान, अर्थसहाय्य दर - जास्तीत
जास्त रु. 0.03.
बाब - ट्रॅक्टर
चलित स्प्रेअर ( बुम टाईप),
अर्थसहाय्य दर - जास्तीत जास्त रु.0.41.
बाब - ट्रॅक्टर
चलित स्प्रेअर ( एयर कॅरीयर/असिस्टेट ), अर्थसहाय्य दर - जास्तीत
जास्त रु. 1.38.
बाब - ट्रॅक्टर
चलित स्प्रेअर इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर, अर्थसहाय्य दर - जास्तीत
जास्त रु. 2.50.
बाब - फार्म गेट
पॅक हाऊस चलित हाताळणी ट्रॉली, सॉर्टिंग टेबल,
आर्थिक मापदंड रु.- रु.4.80 लाख प्रति युनिट प्रति लाभार्थी
आकारमान- 9 मी. X 6 मी., अर्थसहाय्य दर - ग्राह्य भांडवली खर्चाच्या - 50 % रु.2.40 लाख.
बाब - शीतगृह युनिट प्रकार- 1
(सी.एस.-1), आर्थिक मापदंड रु.- रु. 9600 प्रति मे.टन (कमाल मर्यादा 5000 मे.टन), अर्थसहाय्य दर - बँक कर्जाशी निगडीत सर्वसाधारण
क्षेत्र- 35%.
बाब - शीतवाहन, आर्थिक
मापदंड रु.- रु.3.45
लाख प्रती मे.टन
कमाल क्षमता 14 मे.टन.,
अर्थसहाय्य दर - सर्वसाधारण
क्षेत्र-35% बँक कर्जाशी निगडीत.
बाब - शीतवाहन, आर्थिक
मापदंड रु.- रु.3.45
लाख प्रती मे.टन
कमाल क्षमता 14 मे.टन.,
अर्थसहाय्य दर - सर्वसाधारण
क्षेत्र-35% बँक कर्जाशी निगडीत.
बाब - प्राथमिक प्रक्रिया केंद्र, आर्थिक
मापदंड रु.- रु.35.00 लाख प्रती युनिट, अर्थसहाय्य दर - सर्वसाधारण क्षेत्र-35% बँक कर्जाशी निगडीत.
बाब - नॉन-प्रेशराईझ्ड व प्रेशराईझ्ड
रायपनिंग रायपनिंग चेंबर (सी.एस.-3), आर्थिक मापदंड रु.-
रु. 1.00 लाख ते
रु.1.20 लाख प्रती मे.टन, अर्थसहाय्य दर - सर्वसाधारण क्षेत्र-35% बँक कर्जाशी निगडीत.
बाब - कमी खर्चाचे कांदाचाळ / लसूण
साठवणूक गृह, आर्थिक मापदंड रु.- रु.8000 प्रती मे.टन, अर्थसहाय्य दर - ग्राह्य भांडवली खर्चाच्या - 50%, 5-25 मे.टन :- रु.4000 प्रती मे.टन.
टिप :- विविध घटकनिहाय अनुदानाचे दर कमीत-कमी व
जास्तीत जास्त दर्शविण्यात आलेले आहे. परंतु त्याघटक/बाबीसाठी अर्ज केल्यानंतर
प्रत्यक्षात देय अनुदान निश्चित होईल.
वरील घटकांचा लाभ घेण्याकरीता प्रमुख अटी व शर्ती खालीलप्रमाणे
आहेत.
1.
उपरोक्त घटकांकरीता शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin
या संकेतस्थळावर
ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. त्यानंतर “प्रथम अर्ज प्रथम लाभ ” या तत्वावर अर्जांची निवड करण्यात
येईल.
2.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती
प्रवर्गासाठी जातीचे प्रमाणपत्र व फार्मर आयडी असणे आवश्यक राहील.
3.
लाभार्थ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर
त्याची मोका तपासणी झाल्यावर त्यांच्या बॅक खात्यात निधी तात्काळ जमा करण्यात येईल.
4.
उपरोक्त घटकांकरीता शेतकऱ्यांनी यापूर्वी
अर्ज सादर केले असतील तर पुनश्च: अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.
5.
उपरोक्त घटकांच्या अधिक माहितीसाठी
नजिकच्या मंडळ कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी तसेच संबधित गावातील उप कृषी अधिकारी
/ सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी आयुक्तालय पुणे संचालक
(फलोत्पादन) अंकुश माने यांनी केले आहे.
0000000000
Comments
Post a Comment