राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी होणार ठाण्यात
ठाणे,दि.30(जिमाका):- महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने
सन 2026-27 या वर्षासाठी राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले आहे.
ही
स्पर्धा दि.31 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर 2026 दरम्यान तालुका क्रीडा संकुल, कोपरी, जि.
ठाणे येथे होणार आहे.
या
स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा दि.31 ऑक्टोबर 2026 (शनिवार) रोजी सकाळी 10.00 वाजता
तालुका क्रीडा संकुल, कोपरी, जि. ठाणे येथे संपन्न होणार असून या राज्यस्तरीय शालेय
मल्लखांब क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हा क्रीडा
अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी
सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे नमूद केले आहे.
0000000000

Comments
Post a Comment