शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या ऑनलाइन अर्जास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
ठाणे,दि.26(जिमका)
:- महाराष्ट्र
शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘शिवछत्रपती
राज्य क्रीडा पुरस्कार’ (सन 2024-25 व सन 2025-26) अर्ज प्रक्रियेस शासनाने पाच दिवसांची
मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पात्र अर्जदारांना दि.30 नोव्हेंबर, 2026
रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.
क्रीडा
क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षींकरिता जीवन गौरव
पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता राज्य
क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा
पुरस्कार (खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू) या विविध श्रेणींमध्ये हे
पुरस्कार प्रदान करण्यात येतात. दि.29 डिसेंबर, 2023 व दि.25 जानेवारी, 2024 च्या
शासन निर्णयान्वये विहित केलेल्या सुधारित नियमावलीनुसार ही पुरस्कार प्रक्रिया
राबविण्यात येत आहे.
सदर
पुरस्कारांसाठी यापूर्वी दि.12 ऑक्टोबर, 2026 ते दि.25 नोव्हेंबर, 2026 या
कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, इच्छुक क्रीडा मार्गदर्शक,
खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडूंना अर्ज सादर करण्यास अधिक संधी मिळावी या
हेतूने दि.26 नोव्हेंबर, 2026 पासून पुढे पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
पात्र
अर्जदारांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या
0000000000
Comments
Post a Comment