प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांची ठाणे रिंग मेट्रो कार शेडच्या जागेवरील अतिक्रमणांवर धडक कारवाई वडवलीतील 8 वाणिज्य बांधकामे हटवण्यास सुरुवात


 


 

ठाणे,दि.27(जिमाका): महत्त्वाकांक्षी ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून, कार शेडच्या नियोजित जागेतील अतिक्रमणांविरोधात अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या निर्देशानुसार आज धडक मोहीम हाती घेण्यात आली.

            मौजे वडवली (कासारवडवली परिसर) येथील सर्व्हे क्रमांक 142 मधील जागेवर उभारण्यात आलेली एकूण 8 वाणिज्य स्वरूपाची अनधिकृत अतिक्रमणे प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून ही सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

            प्रकल्पाच्या कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी ही जागा अतिक्रमणमुक्त करणे आवश्यक होते. त्यानुसार, आज 27 नोव्हेंबर रोजी सकाळी  संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने मौजे वडवली येथील स.नं. 142 या ठिकाणी जाऊन अतिक्रमण धारकांना याबाबत कल्पना देत निष्कासनाच्या कामाला सुरुवात केली.

            वाणिज्य वापरासाठी उभारण्यात आलेली ही आठही बांधकामे जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, यामुळे रिंग मेट्रो कार शेडच्या पुढील कामाचा मार्ग मोकळा होणार आहे.

00000000


Comments

Popular posts from this blog

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती