नागरिकांसाठी कायदेविषयक साक्षरता शिबीर शासन स्तरावरील विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ

 


 

ठाणे,दि.02(जिमाका) :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्यातर्फे शनिवार, दि.28 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 10:00 वाजता वन प्रशिक्षण संस्था, शहापूर, जि. ठाणे येथे नागरिकांकरीता कायदेविषयक साक्षरता शिबिराद्वारे विधी सेवा व सहाय्य तसेच शासन स्तरावरील विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्याकरीता एकाच छताखाली, उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी शासनाद्वारे वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वीत केल्या जातात परंतु सर्वच नागरिकांपर्यंत या योजना पोहोचतात असे दिसून येत नाही व त्यासाठीच सदर महाशिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर महाशिबिरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वन विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कामगार आयुक्तालय तसेच सामाजिक क्षेत्रात विविध स्तरावर काम करणाऱ्या एन.जी.ओ. सहभाग घेणार आहेत.

या शिबीरात सर्व शासकीय विभागांमध्ये नागरिकांकरीता असलेल्या सर्व योजनांसाठी अंदाजे 30 ते 35 स्वतंत्र स्टॉल व तज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येणार असून सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे व त्या योजनांचा लाभ मिळवून देणे हा महाशिबिराचा उद्देश असून महाशिबिरासाठी सर्व नागरिकांना मोफत प्रवेश आहे. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याकरीता सर्व स्तरातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सामील होण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे चे सचिव रविंद्र पाजणकर यांनी केले आहे.

00000000000


Comments

Popular posts from this blog

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती