क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शहापूर प्रकल्पांतर्गत नवनिर्मित इमारतींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन लोकार्पण
ठाणे,
दि.16(जिमाका): क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य
साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शहापूर (जि. ठाणे) अंतर्गत येणाऱ्या
विविध आश्रमशाळा व वसतिगृहांमधील पूर्ण झालेल्या नवनिर्मित इमारत बांधकामांचे उद्घाटन
रविवारी, दिनांक 15 नोव्हेंबर 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन
पद्धतीने पार पडले.
शहापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार
सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पंतप्रधान
महोदयांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन झालेल्या इमारतींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
आहे:
1. शासकीय आश्रमशाळा, आंबिवली (ता.
शहापूर) येथील नवनिर्मित शालेय इमारत.
2.
शासकीय आश्रमशाळा, आंबिवली (ता. शहापूर) येथील विद्यार्थिनींचे वसतिगृह.
3.
शासकीय आश्रमशाळा, पिवळी (ता. शहापूर) येथील विद्यार्थिनींचे वसतिगृह.
4.
शासकीय आश्रमशाळा, शेणवे (ता. शहापूर) येथील शाळेचे 'आदर्श आश्रमशाळेत' रूपांतर
करण्यासाठीच्या नवनिर्मित इमारतीचे उद्घाटन.
5.
शासकीय आश्रमशाळा, मढ (ता. मुरबाड) येथील विद्यार्थिनींचे वसतिगृह इमारतीचे
उद्घाटन.
6.
शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह, खर्डी (ता. शहापूर) येथील मुलींचे वसतिगृह इमारतीचे
उद्घाटन.
या
विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण आणि निवासी
सुविधा अधिक बळकट होणार असून, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना हक्काच्या व आधुनिक
सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या कार्यक्रमामुळे परिसरातील आदिवासी
बांधवांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
00000000000
Comments
Post a Comment