‘अमृत ड्रोन मिशन’अंतर्गत आदिवासी युवकांनाही ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; ‘अमृत’ व ‘टीआरटीआय’मध्ये सामंजस्य करार
ठाणे,दि.26(जिमका) :- आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राज्यातील
युवकांसाठी कौशल्यविकास व रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेने
महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘अमृत’ आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था
(टीआरटीआय), पुणे यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे ‘अमृत
ड्रोन मिशन’अंतर्गत अनुसूचित जमाती (आदिवासी) प्रवर्गातील पात्र युवक-युवतींनाही
ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, त्यांना रोजगार व
स्वयंरोजगाराच्या नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत.
महाराष्ट्र
शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या ‘अमृत’मार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकांतील लक्षित गटातील पात्र युवक-युवतींसाठी ‘अमृत ड्रोन मिशन’
राबविण्यात येत आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, सर्वेक्षण तसेच विविध
व्यावसायिक क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता, या
क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. आता
‘अमृत’ आणि ‘टीआरटीआय’ यांच्यातील सामंजस्य करारानुसार, ‘टीआरटीआय’च्या माध्यमातून
पात्र ठरणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनाही या प्रशिक्षणासाठी अर्ज करता
येणार आहे. यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाधारित कौशल्यप्रशिक्षणापासून वंचित राहण्याची
शक्यता असलेल्या आदिवासी तरुणाईला वेगाने विकसित होणाऱ्या ड्रोन क्षेत्रात करिअर
घडविण्याची संधी प्राप्त होणार आहे.
या
प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना ड्रोन तंत्रज्ञानाचे परिपूर्ण ज्ञान,
प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करता येतील. विशेषतः
शेतीतील फवारणी, पीक निरीक्षण, जमिनीचे सर्वेक्षण, मॅपिंग व विविध तांत्रिक
सेवांसाठी ड्रोनचा वापर वाढत असल्याने प्रशिक्षित पायलटसाठी रोजगाराच्या व्यापक
संधी निर्माण होत आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांना नोकरीबरोबरच स्वतःचा
ड्रोन सेवा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन साधता येणार आहे.
‘अमृत’
आणि ‘टीआरटीआय’ यांच्यातील हे सहकार्य आदिवासी युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या
मुख्य प्रवाहाशी जोडणारे ठरले आहे. या उपक्रमासाठी जागा मर्यादित असल्याने
अनुसूचित जमाती प्रवर्गातील इच्छुक व पात्र युवक-युवतींनी विलंब न करता लवकरात
लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन ‘टीआरटीआय’च्या वतीने श्री. निलेश
सागर यांनी केले आहे. अधिक माहिती व अर्जासाठी उमेदवारांनी
00000000000
Comments
Post a Comment