डोंबिवलीत मध्ये अमृत सेवा संकल्प अंतर्गत ‘ती आणि तिचे आरोग्य’ विषयावर विशेष मार्गदर्शन
<,
ठाणे,दि.3(जिमाका)
:- अमृत आणि आरोग्य भारती, कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि.1 नोव्हेंबर 2026 रोजी डोंबिवली पश्चिम येथील ओंकार साई
बाल संगोपन केंद्र, अवधूत सोसायटी, बकुळ बंगला, सिटी हॉस्पिटलजवळ येथे ‘ती आणि तिचे आरोग्य’ या विषयावर विशेष आरोग्य
मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 20 ते 25 मुलींनी
उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमात
डॉ. रिता श्रीवास्तव (आरोग्य भारतीच्या राष्ट्रीय महिला प्रमुख) यांनी मुलींना
महिलांचे आरोग्य, आरोग्यविषयक
समस्या आणि आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
किशोरवयीन मुलींनी आपल्या आरोग्याविषयी जागरूक राहावे, आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये आणि आवश्यकतेनुसार
तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, याबाबत त्यांनी
महत्त्वपूर्ण माहिती दिली.
यावेळी अमृत
ठाणे जिल्ह्याच्या उपव्यवस्थापक
माया रत्नपारखी-खेत्रे यांनी ‘अमृत
वर्ग’ या उपक्रमाचीही सविस्तर माहिती दिली. अमृत वर्ग हा केवळ अभ्यासापुरता
मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक आणि नैतिक विकासाला
प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. या वर्गामध्ये बौद्धिक खेळ, मैदानी खेळ, प्रार्थना आणि संस्कारवर्गाच्या स्वरूपातील विविध उपक्रमांचा समावेश असतो. दिवाळीनंतर
हा उपक्रम चालू करू असे आश्वासन संस्थापिका दांडेकर मॅडम यांनी दिली.
या
कार्यक्रमासाठी आरोग्य भारतीच्या ऊर्जिता जोशी आणि मैथिली भालेराव यांचे सहकार्य
लाभले. तसेच ओंकार साई बाल संगोपन केंद्राच्या संस्थापक सुविधा दांडेकर आणि
व्यवस्थापक अनिकेत हिंदळेकर यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
मुलींमध्ये
आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना आरोग्यविषयक योग्य माहिती देणे आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून
देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
‘निरोगी स्त्री, सशक्त कुटुंब
आणि सुदृढ समाज’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुलींचा
चांगला प्रतिसाद मिळाला. अमृत आणि आरोग्य भारती यांच्या संयुक्त पुढाकारातून
राबविण्यात आलेला हा उपक्रम मुलींच्या आरोग्यविषयक जागृतीच्या दृष्टीने
महत्त्वपूर्ण ठरला.
0000000000
.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment