डिजीटल जीवन प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयात केंद्र शासनाच्या अवर सचिवांची भेट जीवन प्रमाणपत्राचे प्रात्यक्षिक

 


ठाणे,दि.3(जिमाका) :- राज्य शासकिय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना निवृत्तीवेतन नियमीत सुरु राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या जीवन प्रमाण अॅप व पोर्टलच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना बँक किंवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष न जाता मोबाईलव्दारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येतो.

यासाठी भारत सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागामार्फत 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत देशभरातील 2 हजार शहरे व जिल्ह्यांमध्ये पाचवी डिजीटल मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे अवर सचिव दिपक गुप्ता यांनी दि.30 ऑक्टोबर 2026 रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे येथे भेट देऊन अभियानाचा आढावा घेतला. तसेच उपस्थित ठाणे कोषागारातील अधिकारी / कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना जीवन प्रमाण पोर्टलवर डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रात्यक्षीक करुन दाखवले. तरी जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारक व कुटूंब निवृत्तीवेतनधारक यांनी जीवन प्रमाण पोर्टलचा वापर करुन डिजिटल स्वरुपात हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी, ठाणे महेशकुमार कारंडे यांनी केले आहे.

00000000000


Comments

Popular posts from this blog

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध मनाई अणि निवारण) अधिनियम 2013 (Posh Act) ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती