Posts

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नूतन ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय बांधकाम स्थळाला दिली भेट

Image
ठाण्याचे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय  येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल  -आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर ठाणे,दि.12(जिमाका):-  रुग्णालय ही फक्त इमारत एक नसते, ती मानवतेची सेवा आणि करुणेचा पाया असते. ठाण्याचे हे नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी आशेचा किरण ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे केले. राज्याचे सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामस्थळास भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्य रुग्णालय इमारतीमधील बाहयरुग्ण विभाग, अपघात विभाग, एमआरआय विभाग, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, क्ष-किरण, मॅमोग्राफी, आंतररुग्ण विभाग, प्रसूती विभाग, मॉडयुलर शस्त्रक्रियागृह तसेच हेलीपॅड तसेच वाहनतळ इमारत व परिचारीका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृह आणि वसतीगृह इमारतीची पाहणी केली. या बांधकामाचे क्षेत्रफळ हे 92 हजार 539.00 चौ.मी. असून आरोग्य मंत्री श्री.आबिटकर यांनी पाहणी दरम्यान नवीन रुग्णालयाचे बांधकाम 87 ...

कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहन संवर्गासाठी नविन मालिका सुरु

ठाणे,दि.12(जिमाका):-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण येथे दुचाकी या संवर्गासाठी MH05GF ही नविन मालिका साधारणतः दि.19 नोव्हेंबर 2025 रोजी सुरु करण्यात येणार आहे. तरी नवीन दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक घेण्यासाठीचे अर्ज दि.12 ते 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत स्विकारले जातील, असे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे. 00000

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर ठाणे जिल्हा दौऱ्यावर

Image
ठाणे,दि.11(जिमाका):-  राज्याचे सार्वजनिक आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे बुधवार, दि.12 नोव्हेंबर 2025 रोजी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 7.45 वाजता नवीन सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे येथे आगमन व नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी (स्थळ: नवीन सिव्हिल हॉस्पिटल, टेंभी नाका, कोर्टाच्या बाजूला, ठाणे पश्चिम), सकाळी 9 वाजता नवीन सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे येथून मोटारीने सुरुची-15, शासकीय निवासस्थान, मुंबईकडे प्रयाण. 00000

कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य; आधुनिक शेतीच्या दृष्टिकोनातून नवी ओळख

Image
ठाणे,दि.11(जिमाका):-  सन 1881 च्या फेमीन कमिशनने शिफारस केल्यानुसार जुलै 1883 मध्ये कृषी खात्याची स्थापना करण्यात आली. सद्य:स्थितीत कृषी विभागाचे वापरले जात असलेले बोधचिन्ह व घोषवाक्य हे 38 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले आहे. आधुनिक शेतीच्या दृष्टीकोनात व विभागाच्या कार्यपद्धतीत झालेल्या मूलभूत बदलांच्या पार्श्वभूमीवर सद्य:स्थितीत असलेले बोधचिन्ह रचना/दृश्य व संवादात्मक ओळख कालबाह्य ठरू लागली आहे. यामुळे सध्याच्या काळाशी सुसंगत, प्रभावी व सर्जनशील बोधचिन्ह व घोषवाक्य तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. यानुषंगाने बोधचिन्ह व घोषवाक्य अद्ययावत करण्यासाठी कृषी विभागाकडून खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त होण्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक आवाहन करण्यात आले होते. वर्तमानपत्रामधून जाहिरात प्रसिद्ध करून तसेच कृषी विभागाच्या समाज माध्यमांतून प्रसिद्धी देण्यात आली होती. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी/ प्राध्यापक/ संशोधक/ कलाकार/ डिझायनर्स/ लेखक/ अभ्यासक/ अधिकारी/ कर्मचारी/ इतर इच्छुक व्यक्तींनी आपली कलात्मक संकल्पना सादर करण्यासाठी कला महाव...

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची कार्यवाही सुरळीत सुरु -व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख

ठाणे,दि.10(जिमाका):- अलीकडील काही दिवसांपासून मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागारा विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत "महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे, व्याज परतावा थांबविण्यात आला आहे" अशा प्रकारच्या निराधार अफवा काही व्यक्तींकडून सोशल मीडियासह विविध माध्यमांतून पसरवल्या जात आहेत. या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसून, महामंडळाचे नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरु आहेत. यानुषंगाने काही बाबी सर्वसामान्यांना कळविण्यात येत आहेत, असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबई व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख (भा.प्र.से.) यांनी कळविले आहे. महामंडळाच्या कामाकाजाबाबतची वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे … निर्माण झालेले LOI - जुलै 2025-10,811, ऑगस्ट 2025- 8,817, सप्टेंबर 2025- 13,733, ऑक्टोबर - 2025 - 1,422, 6 नोव्हेंबर, 2025 पर्यंत - निरंक, जुलै,2025 पासून आजपर्यंत - 34,783. Bank Sanction संख्या - जुलै 2025-4,808, ऑगस्ट 2025- 4,999, सप्टेंबर 2025- 4,104, ऑक्टोबर - 2025 - 2,384, 6 नोव्हेंब...

भूमी अभिलेख विभागातील रिक्त भूकरमापक पदाची भरती प्रक्रिया सुरु

ठाणे,दि.10(जिमाका):- भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता दि.01 ऑक्टोबर 2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार दि.01 ऑक्टोबर 2025 ते 24 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचे कामकाज करण्यात आलेले आहे. या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दि.13 नोव्हेंबर 2025 व 14 नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत वेळापत्रक खालीलप्रमाणे … दिनांक - 13 नोव्हेंबर 2025 - सत्र -1- विभाग- पुणे विभाग, अमरावती विभाग, उमेदवारांसाठी रिपोर्टींगची वेळ - सकाळी 8.00 वा. सत्र – 2 - विभाग- नाशिक विभाग, नागपूर विभाग, उमेदवारांसाठी रिपोर्टींगची वेळ - दुपारी 12.00 वा. दिनांक - 14 नोव्हेंबर 2025 - सत्र -1- विभाग- मुंबई (कोकण) विभाग, उमेदवारांसाठी रिपोर्टींगची वेळ - सकाळी 8.00 वा. सत्र - 2 - विभाग- छत्रपती संभाजीनगर विभाग, उमेदवारांसाठी रिपोर्टींगची वेळ - दुपारी 12.00 वा. परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे ...

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक पदे भरण्यासाठी 26 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

ठाणे,दि.10(जिमाका):- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सरळसेवेने लिपिक टंकलेखक गट ‘क’ ही पदे भरण्याकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने दि.05 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, जास्तीत जास्त उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळण्याकरिता अर्ज भरण्याची मुदतवाढ दि.26 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत देण्यात येत आहे, असे सैनिक कल्याण विभाग संचालक कर्नल दिपक ठोंगे (निवृत्त) यांनी कळविले आहे.                                                               00000