माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार
माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार दि.31 ठाणे जिमाका : ठाणे , पालघर जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या सर्व माजी सैनिक विधवांनी शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये बोर्डाच्या शालांत परिक्षा इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक परिक्षा इयत्ता 12 वी या परिक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या पाल्यांची नावे एअर मार्शल व्ही.ए पाटकर विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसहित दि 15 सप्टेंबर पर्यंत सादर करावीत. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 022-25343174 वर संपर्क साधावा , असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे /पालघर यांनी केले आहे 0000000