भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुर्वणसंधी
ठाणे दि. 30 ( जिमाका):भारतीय सैन्यदल , नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र , नाशिक रोड , नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 18.09.2019 ते 27.09.2019 या कालावधीत SSB कोर्स क्र. 50 आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास , भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. ठाणे , पालघर जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय ठाणे येथे दिनांक 16/09/2019 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेज वरती किंवा सैनिक कल्याण विभाग , पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Check List यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्...