विशेष लेख क्र.05 - ज्येष्ठांची काळजी घेणारी “मुख्यमंत्री वयोश्री योजना”
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiEhPq9meo17wdIMhF6VM3jyE3zl9u0ZuQby9edI7ZMUjMFLPZm_yjeinaKsDmVVA_a1F1n91ntA33KMbtzM92x1KnoYniChcCHDIqpX5nrSy9kuOX1axJjUG5e_54cCm_owAh0vQEKniM7H6u-rvwJzNfccFXLOTFG5q5zke7L0VVBDZi7inY465lSk-zk/w400-h200/maha-gov-logo-1.jpg)
मनः स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे त्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करुन त्याचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11 कोटी 24 लाख असून त्यापैकी सद्य:स्थितीत 65 वर्षे व त्यावरील अंदाजे एकूण 1 कोटी 50 लाख ज्येष्ठ नागरिक आहेत. आज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारपणाचा सामना करावा लागतो. केंद्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या धर्तीवर दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) संबंधित दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने, उपकरणे पुरविण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. योजनेचे स्वरुप: • ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टि...