Posts

हरवलेल्या व्यक्तीचा शोध

ठाणे दि.10( जिमाका): कासारवडवली पोलीसठाण्याच्या हद्दीतील मोहन मारुती मोरे वय 35 वर्षे हे बेपत्ता झाले असून त्यांचे   वर्णन असे आहे. रंग-सावळा,उंची 5फुट,चेहरा गोलाकार,डोळे काळे,नाक सरळ,डोक्याचे केस काळे,पिवळया रंगाचा टी शर्ट व राखाडी रंगाची हाफ पॅन्ट,असा आहे. पत्ता-पातळीपाडा,दुर्गानगर,कोकण प्रिटीग प्रेस समोर,जी.बी.रोड ठाणे.या वर्णनाची व्यक्ती कोणास आढळल्यास वरिष्ठ पोलीस निरिक्षक,कासार वडवली पोलीस स्टेशन ठाणे,यांना कळवावे,असे आवाहन करण्यात आले आहे. 000000

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात सव्वा लाख लाभार्थ्यांची नोंदणी लाभार्थ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा लाभ तातडीने द्यावा

            ठाणे, दि. 18 (जिमाका) :-   प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये आता पर्यंत 1 लाख 24 हजार 742 लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. लाभार्थ्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचा लाभ तातडीने मिळावा यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून प्रयत्न करावेत असे निर्देश आज झालेल्या जिल्हास्तरीय सुकाणू व सनियंत्रण समितीच्या बैठकीत देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत तीन टप्प्यामध्ये पाच हजार रुपये लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात. जिल्ह्यातील तसेच महापालिका क्षेत्रातील लाभार्थ्यांना त्यांचा दुसरा आणि तिसरा हप्ता तातडीने वर्ग करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने प्रयत्न करावेत असे श्री.ठोंबरे यांनी यावेळी सांगितले. आवश्यकता भासल्यास आधारक्रमांक नोंदणीसाठी विशेष शिबीरे आयोजित करावेत. त्याच प्रमाणे अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकाने सर्व बँकांना निर्देश देऊन लाभार्थ्यांचे खाते कमीत कमी काग...

जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समितीची सभा संपन्न जिल्हा सामान्य रुग्णालयातील मॉडेल ॲण्टी रेबीज क्लिनिकच्या स्थापनेस गती द्यावी-सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी

Image
  ठाणे दि.१७ (जिमाका): श्वानदंशामुळे होणाऱ्या रेबीज आजाराचे निर्मूलन २०३० पर्यंत करण्याचे उद्दिष्ट असून त्या   दृष्टीने ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मॉडेल ॲण्टी रेबीज क्लिनिकच्या   स्थापनेस गती द्यावी, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे यांनी आज येथे केली. जिल्हास्तरीय प्राणीजन्य आजार समितीची सभा श्री. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी, पाळीव प्राण्यांची नोंदणी करुन त्यांचे नियमीत लसीकरण करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. हवामान बदलाचा मानवी जीवनावर आणि आरोग्यावर विविध प्रकारे परिणाम होत आहे.जागतीक हवामान बदलाच्या आरोगयाशी     संबधित समस्यांशी लढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.पर्यावरण रक्षण ही प्रत्येकांची जबाबदारी आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे ही श्री.ठोंबरे यांनी सांगितले. रेबीज निर्मुलनाच्या मोहिमेसाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात मॉडेल ॲण्टी रेबीज क्लिनिक स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे रेबीज रुग्णांचे...

ठाणे जिल्ह्यात 11 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदाल

  ठाणे दि.16 ( जिमाका) :   ठाणे व पालघर जिल्हयातील   सर्व तालुका न्यायालये , कौटुंबिक , कामगार , सहकार व इतर न्यायालयांमध्ये   जिल्हा न्यायाधीश- 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ठाणे तथा प्रभारी अध्यक्ष   ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एन.के ब्रम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली   दि. 11 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेदहा   वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय लो क अदालती मध्ये   दिवाणी , फौजदारी , वैवाहिक , १३८ एन . आय . अ ॅ क्ट ( चेक संबंधिची ) अन्व ये दाखल झालेली प्रकरणे , बँक वसुली प्रकरणे , मोटर अपघात नुकसान भरपाई , कौटुंबिक वाद , कामगार विषयक वाद , भूसंपादन प्रकरणे , वीज व पाणी विषयक देयक प्रकरणे , महसूल प्रकरणे तसेच दाखल पूर्व प्रकरणे   इत्यादी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत . सर्व पक्षकारां नी   या संधीचा फायदा घ्यावा व आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोक अदालतीचे ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयाला अर्ज करावा , असे आवाहन करण्यात आले आह...
  कल्याण येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश ठाणे दि.16( जिमाका):मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कल्याण येथील इयत्ता आठवी ते   बारावी     विद्यार्थ्यांना सन 2021-22 करीता   प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे .   प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राहाण्याची सोय व अंथरुण-पांघरुण, दुध, नाश्ता, दोन वेळचे जेवण, फळ, दरमहा निर्वाहभत्ता रु.500/-, सुसज्ज ग्रंथालय,संगणक कक्ष इत्यादी सोयी मोफत देण्यात येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह,कल्याण,पुष्पकधाम अपार्टमेंट,बी विंग,1 ला माळा,बेतुरकरपाडा,कल्याण (प) येथे संपर्क करावा असे आवाहन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाचे व्यवस्थापक यांनी केले आहे.

उल्हासनगर येथील मागासवर्गीय (गुणवंत)मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

ठाणे दि.16( जिमाका):मागासवर्गीय (गुणवंत)मुलींचे शासकीय वसतिगृह, उल्हासनगर येथील इयत्ता अकरावी ते   बारावी     विद्यार्थ्यांना रिक्त   जागेवर सन 2021-22 करीता   प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे .   प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राहाण्याची सोय व अंथरुण-पांघरुण, दुध, नाश्ता, दोन वेळचे जेवण, फळ, दरमहा निर्वाहभत्ता रु.500/-, सुसज्ज ग्रंथालय,संगणक कक्ष इत्यादी सोयी मोफत देण्यात येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी शांती चेंबर्स बिल्डिंग उल्हासनगर -5 येथे   संपर्क करावा असे आवाहन मागासवर्गीय (गुणवंत)मुलींचे शासकीय वसतिगृहाचे व्यवस्थापक यांनी केले आहे. 000000

भिवंडी येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

    ठाणे दि.16 (जिमाका):मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह भिवंडी येथील सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी वसतीगृहामध्ये दि.16 नोव्हेंबर 2021 पासून ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.असे वसतीगृहांचे व्यवस्थापक श्रीमती आर. एन. गोन्नाडे यांनी कळविले आहे.              इयत्ता आठवी ते बारावी व महाविद्यालयीन विभाग, पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून )ऑफलाईन अर्ज भरु शकतील . या योजनेसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग,आर्थिकदृष्टया मागासवप्रवर्ग, अपंग, अनाथ, दारिद्र रेषेखालील विद्यार्थी ऑफलाईन अर्ज करण्यास पात्र आहेत.   पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा अनु. जातीसाठी रु.२.०० लाख, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी रु. १.०० लाख अपंग व अनाथ यांचयसाठी उत्पन्नाची मर्यादा नाही.अर्जात भरलेली माहिती चुकीची असल्यास आवश्यक कागदपत्रे नसल्यास प्रवेश रद करण्याचे अधिकार वसतीगृहाचे गृहप्रमुख / गृहप...