Posts

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई भिवंडीसह कोकण विभागात 12 कोटींहून अधिक किमतीचा संशयास्पद खाद्यसाठा जप्त

Image
    ठाणे, दि.2(जिमाका) :- दिवाळी आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची सुरक्षा आणि अन्नपदार्थांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) गुप्तवार्ता दक्षता विभागाने धडक कारवाई मोहीम राबवली आहे. सह आयुक्त श्रीमती प्रिती टिपरे (दक्षता) आणि सह आयुक्त सचिन जाधव (कोकण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत या आठवड्यात एकूण १२,४२,८७,१५३ रुपयांचा संशयास्पद आणि मिथ्याछाप अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. भिवंडी येथील डीमार्ट (ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड) मध्ये २९ ऑक्टोबर २०२६ रोजी टाकलेल्या छाप्यामध्ये १,३१,२११ किलो वजनाचे आणि ४,०६,६४,४८४ रुपये किमतीचे खाद्यतेल जप्त करण्यात आले. हे खाद्यतेल मिसब्रँडेड लेबल दोष आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय आहे. याशिवाय, 27 ऑक्टोबर रोजी भिवंडीतीलच अंबीया ट्रेडर्सवरही कारवाई करण्यात आली; तिथे जुन्या डब्यांचा वापर करून अस्वच्छ जागेत खाद्यतेलाचे पॅकिंग केले जात असल्याने ९८३ किलो वजनाचा आणि १,८२,६७८ रुपये किमतीचा साठा जप्त करून अन...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा दि.31 ऑक्टोबर 2026 रोजी ठाणे जिल्हातील दौरा कार्यक्रम

      ठाणे,दि.30(जिमाका) :- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे उद्या दि.31 ऑक्टोबर 2026 रोजी ठाणे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 18.00 वाजता ठाणे येथे आगमन कोलशेत रोड ठाणे पश्चिम येथील वुलन रिसर्च असोसिएशनच्या 63 व्या स्थापना दिवस सोहळयास उपस्थित राहणार आहेत व नंतर सोईनुसार शासकीय विश्रामगृह ठाणे कडे प्रयाण. 00000000000

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

Image
  विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026   ठाणे,दि.30(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या 'विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026' च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची एक विशेष आढावा बैठक समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली.   यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने व विविध राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.             या बैठकीमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत सद्यस्थितीचा आढावा देण्यात आला. लोकशाहीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि मजबूत करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट असणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मांडले, तर नवीन मतदारांची नावनोंदणी वेळेत पूर्ण करणे यावर बैठकीत भर देण्यात आला. महाराष्ट्रातील मतदारयाद्यांच्या विशेष फेरपडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडून सुधारित वेळाप...

राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी होणार ठाण्यात

Image
    ठाणे,दि.30(जिमाका):- महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2026-27 या वर्षासाठी राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.                 ही स्पर्धा दि.31 ऑक्टोबर ते 01 नोव्हेंबर 2026 दरम्यान तालुका क्रीडा संकुल, कोपरी, जि. ठाणे येथे होणार आहे.             या स्पर्धेचा अधिकृत उद्घाटन सोहळा दि.31 ऑक्टोबर 2026 (शनिवार) रोजी सकाळी 10.00 वाजता तालुका क्रीडा संकुल, कोपरी, जि. ठाणे येथे संपन्न होणार असून या राज्यस्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय असल्याचे नमूद केले आहे. 0000000000            

'एल निनो' आणि दुष्काळी परिस्थिती: सुपारी बागांचे शाश्वत व्यवस्थापन

      सुपारी हे एक बारमाही पीक असून त्याला वर्षभर भरपूर पाणी आणि दमट हवामानाची आवश्यकता असते. अत्यधिक उष्णता आणि प्रखर सूर्यप्रकाश सुपारीच्या वाढीस व उत्पादनास बाधक ठरतो, ज्यामुळे विविध विकृती निर्माण होतात. अशा परिस्थितीत बागेस पाण्याचा ताण बसल्यास झाडांची आणि उत्पादनाची अपरिमित हानी होते. या पार्श्वभूमीवर, दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये सुपारी बागांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. 'एल निनो' आणि दुष्काळाचा सुपारी पिकावरील प्रभाव पाण्याच्या तीव्र कमतरतेमुळे आणि अचानक वाढलेल्या तापमानामुळे सुपारीची फळगळ होण्याची दाट शक्यता असते. तसेच, नवीन येणारा तसेच पूर्वहंगामी फुलोरा आणि त्यातील नर-मादी फुले व कळ्या गळण्याचा धोका निर्माण होतो. प्रखर उन्हामुळे (विशेषतः नैऋत्य दिशेकडील उन्हामुळे) सुपारीच्या खोडाला भेगा पडून झाडे कमकुवत होतात. दीर्घकाळ पाण्याचा ताण राहिल्यानंतर बागेस अचानक पाणी पुरवठा झाल्यास किंवा जमिनीत पुरेशी आर्द्रता न राहिल्यास सुपारीचे टोक तडकून फळगळीची समस्या बळावते. एकदा सुपारीच्या बागेस पाण्याचा ताण बसल्यास, बाग पूर्वपदावर येऊन पूर्ववत् उत्पादन मि...

सुक्ष्म सिंचन घटकाखाली अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार ९०% अनुदान

    ठाणे,दि. 30 (जिमाका) :- ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक ही योजना सन २०२६-२७ मध्ये राबविण्यात येत असून, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी अर्ज मागविण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सूक्ष्म सिंचन क्षेत्रात वाढ करणे, जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे कृषी उत्पादन व पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, कुशल व अकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्यानुषंगाने, ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जाणार आहे. तरी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत. शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना सर्व माहिती अत्यंत अचूक भरावी, अन्यथा अर्ज...

देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा महावितरणचे यश

Image
  ठाणे,दि.२ ९ (जिमाका) :-   मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीच्या सौर ऊर्जा निर्मिती योजनेत निर्माण झालेली अतिरिक्त वीज तसेच ग्रीडद्वारे उपलब्ध स्वस्त सौर ऊर्जा बॅटरीमध्ये साठवून सायंकाळी मोठ्या वीज मागणीच्या वेळी वापरण्यासाठी महावितरणने 1000 मेगावॅट अवरचा टप्पा गाठला आहे. देशात प्रथमच विकेंद्रित स्वरुपात बॅटरीचा वापर करून इतका मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा करण्यात येत असून राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे वाढलेल्या वीजमागणीच्या काळात हा वीजपुरवठा अत्यंत उपयुक्त ठरला आहे , अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. त्यांनी सांगितले की , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही गेमचेंजर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत सुमारे 7 हजार मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प सुरू झाले आहेत. या प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज कृषीपंपांना देण्यात येते. अतिरिक्त वीज बॅटरीमध्ये साठवू...