Posts

Showing posts from June, 2019

तलाठी भरती परिक्षार्थीना सुचना

तलाठी भरती परिक्षार्थीना   सुचना ठाणे दि. 29 (जिमाका) : महसुल विभागाच्या आखत्यारित असलेल्या तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही महा-आयटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. 2 जुलै ते 26 जुलै या कालावधीत सकाळी 10 ते 12 व दुपारी 2.30 ते   4.30   या वेळेत तळाठी परिक्षा घेण्यात येणार आहे.सदर परिक्षेचे पुर्ण संचलन व कार्यान्वयन महा.आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभाच्या माध्यमातुन ई-महापरिक्षा मार्फत घेण्यात येत आहे.उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्हायात परिक्षा देण्यासाठी संगणक विषयक पायाभूत सोयी असणाऱ्या शाळा,कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात आली आहे.122 परिक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. परिक्षा केंद्रावर उपस्थित राहताना उमेदवाराने पॅन कार्ड,पासपोर्ट,वाहन चालवण्याचा परवाना,मतदान ओळखपत्र,मुळ फोटोसह राष्ट्रीयकृत बॅक पासबुक,आधार कार्ड,या पैकी एक पुरवा आपल्या जवळ ठेवावा. रंगित झेरॉक्स चालणार नाही.अशा स्पष्ट सुचना उमेदवारांच्या   हॉल तिकीटवर देण्यात आल्या आहेत.महापरिक्षा पोर्टलवरील तसेच हॉल तिकीटवरील सुचनाचे उमेदवारांनी तंतोतेत पालन करणे आवश्यक आहे.या संदर्भात अधिक म...

इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना अल्प व्याज दरात अर्थसहाय्य

इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना अल्प व्याज दरात अर्थसहाय्य ठाणे दि. 29 (जिमाका) : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग अर्थिक विकास महामंडळ लि.यांच्याकडून मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करुन देत आहे. ठाणे जिल्हामधील गरजू व होतकरु पात्र व्यक्तींना सदरच्या कर्ज योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्ज योजनाची माहिती 20 टक्के बीज भांडवल योजना : इतर मागासवर्ग प्रवर्गातील पात्र व्यक्तींना स्वंय रोजगारासाठी राष्ट्रीयकृत बॅका,ग्रामीण बॅक व अग्रणी बॅकेने पुरस्कृत केलेल्या बॅकाच्या माध्यामातून कर्ज उपलब्ध करुन देते.सदरच्या योजनेत बॅकेचा सहभाग 75 टक्के,राज्य महामंडळाचा सहभाग 20 टक्के व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आहे.व्याजाचा दर महामंडळाच्या कर्जावर दसादसे 6 टक्के रक्कमेवर बॅकेच्या व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.कर्जाची परतफेड हि 5 वर्षामध्ये करावयाची आहे.सदरच्या कर्ज योजनेसाठी पात्र व्यक्ती हि इतर मागासवर्ग प्रवर्गातील असावी व त्याच्या एकत्रित   कुटूबांचे   वार्षिक उत्पन्न हे रु 1 लक्ष पर्यंत असावे. ...

मागासवर्गीय मुलांसाठी मोफत वसतिगृह

  मागासवर्गीय मुलांसाठी मोफत वसतिगृह   ठाणे दि. 27 (जिमाका):   डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे मोफत शासकीय वसतिगृह रिक्त जागेवर प्रवेश देण्यात येत आहे. त्यासाठी सुखसागर अपार्टमेन्ट 2 मजला,घुंघट नगर,कल्याण नाका,भिवंडी,जि,ठाणे. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया ही सुरु झाली आहे. ऑफलाईन अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत. शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज वसतिगृहात मिळतील . प्रवेशाचे निकष:- • विद्यार्थी हा शैक्षणिक वर्षाच्या नियमित अभ्यासक्रमातील प्रथम वर्षासाठी प्रवेशास पात्र असावा.शाळेय विभागासाठी इयत्ता 7 वी उत्तीर्ण व महाविद्यालयीन विभागासाठी इयत्ता 10 वी,12 वी,पदवी उत्तीर्ण असावा. • प्रवेशार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.( Domacile असणे आवश्यक) • प्रवेशार्थी हा अनुसूचित जाती , विमुक्त जमाती , भटक्या जमाती , व इतर मागासवर्गीय , किंवा आथिर्कदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गातील असावा. • शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी प्रवेशार्थी यांचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न अनु. जमाती प्रवेशार्थीसाठी   रु. 2 लाखाचे आत व विमु...

मागासवर्गीय-आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींसाठी मोफत वसतिगृह

मागासवर्गीय-आर्थिकदृष्टया मागासवर्गीय मुलींसाठी मोफत वसतिगृह   ठाणे दि. 27 (जिमाका):   मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींसाठी मोफत शासकीय वसतिगृह प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी सुखसागर अपार्टमेन्ट -5 वा माळा,घुंघट नगर,कल्याण नाका,भिवंडी,जि,ठाणे. सन 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया ही सुरु झाली आहे. ऑफलाईन अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत. शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत अर्ज वसतिगृहात मिळतील . प्रवेशाचे निकष:- • अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती, विमुक्त जाती , भटक्या जाती , विशेष मागास प्रवर्ग , आथिर्कदृष्ट्या मागासप्रवर्ग , अपंग , अनाथ , दारिद्र रेषेखालील विद्यार्थिनी पात्र. • पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा अनु. जातीसाठी रु 2 लाख. विमुक्त जाती , भटक्या जमाती , विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी रु. 1 लाख. (अपंग व अनाथ यांच्यासाठी उत्पन्नाची मर्यादा नाही.) • अभ्यासक्रमाच्या शालेय विभाग इयत्ता 8 वी 9 वी , 10 वी   व महाविद्यालयीन विभाग , पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी ऑफलाईन अर्ज भरु शकतील. • अर्जात भरलेली माहिती चुक...

दुचाकी वाहनांसाठी पसंती क्रमांक

दुचाकी वाहनांसाठी पसंती क्रमांक ठाणे दि. 27 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे   यांच्याकडून दुचाकी वाहनांसाठी MH -04 KC हि नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे .या मालिकेतील पसंती क्रमांक आपल्या वाहनासाठी घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांचे अर्ज सकाळी 10 ते दुपारी 1   या वेळात स्विकारले जातील. पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास लिलाव पध्दतीने क्रमांक देण्यात येतील. आवश्यक शुल्क भरल्यानंतरच क्रमांक आरक्षित केला जाईल.तसे पत्र कार्यालयामार्फत दिले जाईल हेच पत्र वाहन नोंदणी करताना जोडणे आवश्यक आहे.इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी ,ठाणे यांनी केले आहे. 1)       प्रादेशिक परिवहन कार्यालय,ठाणे यांच्या अधिकार कक्षेमध्ये वास्तव्य करणाऱ्या “ VAHAN ” या संगणक प्रणालीवर परिवहनेत्तर संवर्गातील वाहने नोंदणी करु इच्छिणाऱ्या धारकांसाठी MH -04 KC ही नवीन मालिका सुरु MH -04 KB मालिका संपले बरोबर   सुरु करण्यात येणार आहे. 2)      महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 54 (अ) अन्वये नवीन नों...

डी.एल.एड.प्रवेशासाठी मुदत वाढ

डी.एल.एड.प्रवेशासाठी मुदत वाढ ठाणे , दि.26(जिमाका):-महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (वि द्या प्राधिकरण) पुणे यांचेमार्फत शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम( D.EI.ED ) प्रथम वर्ष ऑनलाईन(शासकीय कोटा) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिनांक 24 जून पर्यंत ठेवण्यात आली होती.सदर अर्ज भरण्याची रविवार दि. जून 30 रोजी सायं.6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.याबाबतच्या सर्व सुचना ,प्रवेश पात्रता इत्यादी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या   www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.ऑनलाईन अर्ज भरल्यांनंतरचे फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध असेल,यासाठी संबधितांनी वेळोवेळी संकेतस्थळ पहावे.असे   प्राचार्य,जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास संस्था,रहाटोली जि .ठाणे यांनी कळवले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

Image
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन साजरा ठाणे , दि.26(जिमाका):-सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि.26 जून रोजी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,ठाणे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प.ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने टाऊन हॉल,कोर्ट नाका,ठाणे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .त्याच प्रमाणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प. ठाणे वतीने जि.प.शाळेतील विद्यार्थांनी समता दिंडीचे आयोजन केले होते.यावेळी एका सजविलेल्या रथात छत्रपती शाहु महाराज यांची प्रतिमा ठेवून मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून श्री.रघुनाथ देशमुख यांनी शाहु महाराज यांच्या विषयी विद्यार्थांना मार्गदर्शन माहिती सादर केली.कार्यक्रमाचे प्रमुख श्रीम.सलीम र.तडवी(जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प.ठाणे) यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करुन विद्यार्थांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व शिष्यवृत्तीचे धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम.देहाडे मॅडम व कार...

कांदळवन संदर्भात तक्रारींचे तात्काळ निराकरण करा-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

Image
कांदळवन संदर्भात तक्रारींचे तात्काळ निराकरण करा-जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर ठाणे , दि. 26( जिमाका):- कांदळवनासंदर्भात पर्यावरण प्रेमी नागरीक , तसेच संबधित संस्थांकडून होणाऱ्या तक्रारी व तक्रारीचे निराकरण लवकरात लवकर करण्यात यावे , असे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे दिले.कांदळवनाचे क्षेत्र संरक्षण व संवर्धनासंदर्भात समिती   सभागृहामध्ये जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील , सहाय्यक संचालक नगर रचनाचे   प्रकाश   रविराव , सहाय्यक उप वनसंरक्षक श्रीम.गिरीजा देसाई , उप आयुक्त मिरा भाईंदर म.न.पा. दिपक पुजारी , नायब तहसिलदार व्ही .पवार.व   कांदळवन क्षेत्राशी निगडीत असणारे जिल्हातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नागरिकांच्या तक्रारी संदर्भात चर्चा करण्यातआली. कांदळवन संरक्षण व संवर्धनाच्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणा , अधिकारी , यांना पुढील बैठकीत नागरीकाच्या तक्रारी संदर्भात सर्व माहिती सादर करावी असे निर्देश देण्यात आले. संवेदनशील कांदळवन क्षेत्रात वाहनांना प्रवेशबंदी ब...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन ठाणे दि.2 6 (जिमाका): राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त   जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज समिती सभागृह येथे राजर्षीं शाहूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील , तहसिलदार सर्वसाधारण राजाराम टवटे , आदींसह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

गोवर्धन गोवंश सेवा केंद्रांसाठी अर्ज करण्याचे आवाहन ठाणे दि. 25 (जिमाका): ठाणे जिल्ह्यात पुर्वीची गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना रद्द करुन सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा 2019-20 या अर्थिक वर्षात राबविण्यास शासन मान्यता प्राप्त झाली आहे.या सेवेसाठी इच्छूक संस्थानी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संस्था धर्मदायुक्तांकडे नोंदणीकृत असावी.गोवंश संगोपनाचा कमीत कमी 03 वर्षाचा अनुभव असावा.पशुधन संगोपनासाठी व वैरण उत्पादनासाठी संस्थेकडे स्वत:च्या मालकीची अथवा वर्षाच्या भाडेपट्टीवरची किमान 5 एकर जमीन आसावी.संस्थेच्या नजीकच्या मागील 3 वर्षाचे लेख परिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.एकूण अनुदानाच्या 30 टक्के खेळते भांडवल संस्थेकडे असावे.गोपालन करण्यासाठी खात्याशी करारनामा तसेच राष्ट्रीयकृत बॅकेत खाते असणे आवश्यक आहे. योजनेत केवळ मुलभूत सुविधा निमार्ण करण्याकरिता एकूण 25.00 लक्ष अनुदान देय राहिल.अनुदानासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,ठाणे यांच्याकडे अर्ज व इतर अनुषंगीक माहिती सादर करण्याची अंतिम तारीख 30 जून राहिल.इच्छूक व पात्र संस्थेने अर्ज करावेत अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व प...

अनुसुचित जाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी मोफत उद्योजकता परिचय मेळावा

अनुसुचित जाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी मोफत उद्योजकता परिचय मेळावा ठाणे , दि. 21 ( जिमाका ) : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था(बार्टी ) पुणे द्वारा पुरस्कृत   व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ठाणे द्वारा कल्याण येथे दि.शुक्रवार २८ जून   ते शनिवार दि.२७ जुलै दरम्यान एक महिना   कालावधीचा अनुसुचित जाती प्रवर्गातील युवक युवतीसाठी   मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.    सदर कार्यक्रमा अंतर्गत उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास , सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम , उद्योग   संधी शोध व मार्गदर्शन , उद्योगाविषयी शासनाच्या योजनांची माहिती , बाजारपेठ सर्वेक्षण , प्रकल्प अहवाल , विक्री कौशल्य , डिजिटल मार्केटिंग , आयात निर्यात व्यापार , कामगार कायदे , दुकान कायदे , विविध शासकीय परवाने , करप्रणाली , जीएसटी , इ.   विषयांवर   तज्ञानाकडून माहिती दिली जाणार आहे व प्रत्यक्ष   उद्योग भेटीचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाभार्थी अनुसुचित जाती प्रवर्गातील , किमान ८वी पास , व...

माजी सैनिकांसाठी व्यवसाय प्रशिक्षण

माजी सैनिकांसाठी व्यवसाय प्रशिक्षण ठाणे , दि. 21 ( जिमाका ) :-माजी सैनिकांसाठी स्वयंरोजगार अंतर्गत पशुसंवर्धन,शेळीपालन,मत्सपालन , दुग्धव्यवसाय इत्यादी व्यवसायांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.प्रशिक्षण घेण्यास इच्छूक माजी सैनिकांनी त्वरीत या   फोन नंबरवर 022-25343174 किंवा hc.zswothane@gmail.com   या ईमेल वर संपर्क    करुन सैनिक कल्याण विभाग यांच्याकडे नोंद करावी.असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे यांनी कळविले आहे 000000000

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन ठाणे , दि. 2 1( जिमाका ) :- जिल्ह्यात काही ठिकाणी शासनाच्या परवानगी शिवाय अनधिकृत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत.    या संबंधित शाळा चालकांनी    सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात    शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय शाळा सुरु करु नये , तसेच पालकांनी अनधिकृतशाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी केले आहे.   अशा अनधिकृत शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास    संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी    शिक्षणाचा अधिकारी कायदा 2009 च्या व महाराष्ट्र शासन नियमावली 2011 च्या अनुसार कार्यवाही करावी , असे निर्देशही देण्यात आले आहेत.    तरी पालकांनी जागरुक राहून आपल्या पाल्यांचा प्रवेश अशा अनधिकृत विद्यालयात घेऊ नये. अनधिकृत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही अन्य मान्यता प्राप्त प्राथमिक शाळांमधून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास पालकच जबाबदार राहतील , याची पालक...

31 जुलै पुर्वी सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण पुर्ण करण्याचे आवाहन

31 जुलै पुर्वी सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण पुर्ण करण्याचे आवाहन ठाणे , दि. 2 1 ( जिमाका) :-ठाणे जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना आवाहन करण्यात येते की,सहकार कायद्यातील तरतुदीनुसार सर्व सहकारी संस्थांनी त्यांचे सन 2018-2019 चे वैधानिक लेखापरिक्षण दि.31 जुलै पर्यंत पुर्ण होणे आवश्यक आहे.ज्या सहकारी संस्था त्याचे सन 2018-2019 वे वैधानिक लेखापरिक्षण विहित मुदतीत पुर्ण करुन घेणार नाहीत अशा सहकारी संस्थांवर अशा सहकारी संस्थांवर निबंधकाकडून उचित कायदेशिर कारवाई करण्यात येईल.तसेच जे लेखापरिक्षक सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण विहित मुदतीत पुर्ण करण्यास जाणून बुजून टाळाटाळ,कुचराई करतील अशा लेखापरिक्षकांवर सहकार कायदयातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.असे आवाहन जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-1,सहकारी संस्था सदानंद वुईके यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक सपन्न

Image
                                    जिल्हा नियोजन समितीची बैठक सपन्न ठाणे , दि. 2 1 ( जिमाका) :-जिल्हा नियोजन समितीची जिल्हा वार्षिक योजना , सन 2019-20 चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या   अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विविध विभागांचा मध्ये सन 2018-19 मध्ये झालेला खर्च , सन 2018-20 साठी मंजूर नियतव्यय व त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही   याबाबतचा आढावा घेतला. सन 2019-20   साठी सर्व मंजूर निधी पूर्णपणे खर्ची पडेल   याकरीता सर्व संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. निधी समर्पित होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सर्व संबंधित विभागांना तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ दि. 31 जुलै पर्यंत   सादर करावे , जेणे करुन निधी खर्च होईल. तांत...