Posts

Showing posts from November, 2021

ठाणे शहर परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्ट उड्डाणास 23 जानेवारी पर्यंत मनाई

  ठाणे दि . 29 ( जिमाका ) :- खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन, नियंत्रीत हवाई क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणासाठी दि.23 जानेवारी 2022 मध्यरात्री पर्यंत   मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या संदर्भात पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांनी हे आदेश पारीत केले आहेत. या उड्डाणासांठी सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे. 000000

ठाणे येथे ३ डिसेंबरला पेन्शन अदालतीचे आयोजन

    ठाणे, दि. २९ (जिमाका): ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांसाठी   मुंबई येथील महालेखापाल कार्यालयामार्फत दि. ०३ डिसेंबर २०२१ रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांनी दिली आहे. जिल्हा कोषागार कार्यालय, पहिला मजला, कोर्ट नाका, ठाणे येथे दुपारी २.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत पेन्शन अदालत होणार असून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आवश्यक असलेल्या निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांनी केले आहे. उपस्थित राहणाऱ्या निवृत्तीवेतन धारकांनी   कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.   0000000  

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समिती अध्यक्षपदी सुदाम परदेशी यांची निवड

  ठाणे, दि.25(जिमाका) : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी   महासंघाच्या जिल्हा समन्वय समितीच्या ठाणे जिल्हाअध्यक्षपदी जिल्हयाचे निवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशी तर ठाणे जिल्हयाच्या दुर्गा महिला मंच अध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांची निवड झाल्याचे महासंघाचे   संस्थापक अध्यक्ष ग.दि.कुलथे यांनी आज येथे जाहीर केले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे यांच्या अध्यक्षेतेखाली   बैठक झाली .बैठकीमध्ये जिल्हा कार्यकारणी जाहिर करण्यात आली.जिल्हा समन्वय समितीच्या कार्याध्यक्षपदी अविनाश फडतरे, जिल्हा समन्वय समितीच्या उपाध्यक्षपदी डॉ.तरुलता धानके, सचिवपदी   शेषराव बडे तर   प्रसिध्दी सचिवपदी   अजय जाधव यांची निवड करण्यात आली.   यावेळी कल्याण केंद्राची उभारणी, महागाई , घरभाडे, भत्त्यात वाढ तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.या बैठकीस   राजपत्रित अधिकारी   महासंघाचे पदाधिकारी समीर भाटकर, मोहन पवार, डॉ. मनिष रेंघे, सुधाकर तावडे, डॉ.अविनाश भागवत व ठाणे जिल्हयात...

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात 09 डिसेंबर पर्यंत मनाई आदेश लागू

  ठाणे दि.11(जिमाका) :-   ठाणे जिल्हयातील ग्रामीण कार्यक्षेत्रात दि.09 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. शस्त्रे, तलवारी, भाले,दंडे, सोटे, बंदूका,सुरे, लाठया अथवा काठया अथवा शारिरीक   इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे. कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा लोकांत प्रचार करणे. व्यक्तीचे प्रेत किंवा आकृती किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे. गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे.नीती यास धक्का पोहोचेल अशा किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशा प्रकारची भाषणे तत्वे, हावभाव करणे,   चिन्हे, फलक किंवा कोणतीही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा लोकांत प्रचार करणे. पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे असे श्रीम. वैदही रानडे यांनी कळविले आहे.             पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांना ...

स्वाधारगृह योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावे

ठाणे दि.24(जिमाका): केंद्र पुरस्कृत स्वाधार योजना अंतर्गत राज्यातील निराधार, निराश्रित, नैसगिक आपत्तीत कौटुंबिक हिंसाचारामध्ये बेघर झालेल्या महिलांसाठी नवीन स्वाधारगृह योजना   सुरु करण्यात आली आहे. त्या अंतर्गत सेवायुक्त सुविधा केंद्र चालविण्यासाठी   स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव   सात दिवसात   सादर करावे असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे.   स्वाधार योजना राबविण्यासाठी संस्था अधिनियम 1861अंतर्गत नोंदणीकृत असावी.संस्थेचे स्वतंत्र घटनापत्रक व त्यात संचालक मंडळाचे अधिकारी कर्तव्ये व जबाबदारी यांचा स्पष्टपणे उल्लेख असावा. संस्था व्यक्तीच्या/संस्थेच्या वैयक्तिक फायदासाठी कार्यरत नसावी. संबंधित संस्थेस महिला कल्याण व सामाजिक क्षेत्रातील किमान 5 वर्ष काम करण्याचा अनुभव असावा. आर्थिक परिस्थिती चांगली असावी. काही कारणास्तव शासनाचे अनुदान मिळण्यास विलंब झाला तरीही स्वाधारगृहाचा खर्च करण्यास संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी. याकरीता संस्थेच्या नावे किमान रु.15 लाख 60 हजार इतकी रक्कम बॅकेत मुदत ठेव म्हणून असणे गरजेचे आहे.  ...

कापूरबावडी जंक्शन येथे 28 नोव्हेंबर पर्यंत मध्यरात्रीच्या काळात वाहतूक बंदी

    ठाणे दि. 23   ( जिमाका) : ठाणे महानगरपालिकेमधील कासारवडवली वाहतूक विभागाच्या हद्दीत वडाळा ते कासारवडवली मेट्रोलाईनचे गर्डर टाकण्याच्या कामामुळे दि. 23 ते 28 नोव्हेंबर याकाळात रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करून वाहतूक वळविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविली आहे. प्रवेश बंद   -   मुंबई-नाशिक महामार्गाने माजिवाडा ,   कापूरबावडी घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या जड अवजड व इतर सर्व - प्रकारच्या वाहनांना तत्त्वज्ञान विद्यापीठ ,   कापूरबावडी जंक्शन येथे "प्रवेश बंद" करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग   -   मुंबई-नाशिक महामार्गाने माजिवाडा ,   कापूरबावडी मार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने ही - कापूरबावडी सर्कल येथून उजवे वळण घेवुन बाळकुम नाका ,   भिवंडी आग्रा रोड ,   कशेळी ,   काल्हेर ,   अंजुर फाटा मार्गे किंवा माजीवाडा उड्डाणपुलाखालून यु टर्न घेवून खारेगांव ब्रिज ,   मानकोली नाका मार्गे इच्छित स्थळी ज...

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मनाई आदेश

ठाणे दि. २२ (जिमाका) :- ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दि. 23 नोव्हेंबर २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहे, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह कळविले आहे. या काळात इंस्टाग्राम, वॉट्सअप, ट्विटर, फेसबूक इ. समाजमाध्यमाद्वारे तसेच इतर डिजिटल ,इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारे जातीय तणाव निर्माण करणारे संदेश, चित्र,चित्रफीत प्रसारीत व प्रसिध्द करणास मनाई करण्यात आली आहे. समाजात चुकीची माहिती,अफवांचा जाणीवपूर्वक प्रचार प्रसार करणे यास निर्बंध घालण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण करणाऱ्या मजकुराचे फ्लेक्स बोर्डस, छापील साहित्य प्रसारित ,प्रसिध्द करणे व त्या प्रकारच्या घोषणा देणे,पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र येणे, जाहिर सभा घेणे, मिरवणूका काढणे, मोर्चे, धरणे, रॅली, निदर्शने, घोषणा-प्रतिघोषणा देणे इत्यादी आंदोलनात्मक कृत्यांना या आदेशान्वये मनाई करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह कळविले आहे.

जिल्ह्याची सुपिकता निर्देशांक पातळी जाहीर रब्बी पिकांसाठी एकेरी मुलद्रव्ये असलेली खते वापरून खर्चात बचत करावी- कृषी विभाग

ठाणे, दि. २३ (जिमाका): जमीन आरोग्य पत्रिकेच्या दुसऱ्या चक्रानुसार (सायकल) ठाणे जिल्ह्याची सुपिकता निर्देशांक पातळी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळेमार्फत जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपिकता निर्देशांक फलक लावण्यात आले असून शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी एकेरी मुलद्रव्ये असलेली खते वापरून प्रति एकरी खर्चात बचत करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.   राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिकेच्या दुसऱ्या चक्रानुसार ठाणे जिल्ह्याचा सुपिकता निर्देशांक पातळी नत्र-कमी, स्फुरद- मध्येम आणि पालाश- मध्यम असा आहे. त्यानुसार हरभरा, भुईमूग आणि रब्बी उन्हाळी भात पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी या सुपिकता निर्देशांकानुसार खतांचा वापर करण्यासाठी जिल्हा मृदा चाचणी प्रयोगशाळेमार्फत प्रत्येक ग्रामपंचायीतमधील सुपिकता निर्देशांक फलकावर माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत ही माहिती असून बाजारात उपलब्ध असलेल्या संतुलित आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले आहे. ...

अनुसूचित जाती उपयोजनेतील विकासकामांचे सुधारित प्रस्ताव तातडीने पाठवावेत - अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे

Image
  ठाणे , दि. 23   :   जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत सन 2021-22 या वर्षासाठी विकास कामांच्या निधीसाठी संबंधित विभागांनी तातडीने सुधारित प्रस्ताव पाठवावे , असे निर्देश अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे यांनी आज येथे दिले. जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुसूचित जाती उपयोजना 2021-22 या वर्षाच्या प्रस्तांवासंदर्भात आज श्रीमती रानडे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बलभीम शिंदे , जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी एस.एम. शेरे , जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ए.टी. पाटील , जिल्हा क्रीडा अधिकारी सुचिता ढमाले , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कीर्ती डोईजोडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सन 2021-22 या वर्षासाठीचे अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुसूचित जाती उपयोजनेच्या प्रस्तावांचा आढावा यावेळी घेण्यात आला. अनुसूचित जातील उपयोजनेचा निधी हा योग्य रितीने व लवकरात लवकर खर्च व्हावा , यासाठी विविध विकास कामांचे प्रस्ताव तांत्रिक मान्यता घेऊन पाठवावेत. यापूर्वी कमी प्रमाणात निधी देण्यात आला होता. मात्र आता माग...

हरवलेल्या इसमाचा शोध

        ठाणे दि . 22 ( जिमाका ) :- ठाणे येथील श्री . दुदाप्पा हनुमंत पाटील , ( वय 71 वर्षे, रा. बिल्डिंग नं .1/505, हायलॅन्ड पार्क सोसायटी , ढोकोळी , ठाणे) हा इसम बेपत्ता झाल्याची नोंद कापूरबावडी   पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे .             बेपत्ता इसमाचे वर्णन असे :- अंगाने मध्यम , उंची 5 फूट 4 इंच , रंग गोरा , डोळे काळे , केस - काळे व रिळ ,   नाक सरळ, चेहरा गोल आहे .             असा इसम जर कोणाला आढळल्यास कापूरबावडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. 0000000

हरवलेल्या महिलेचा शोध

            ठाणे दि . 22 ( जिमाका ) :- ठाणे येथील श्रीमती निकीता नितीन रासम , ( वय 3 5 वर्षे, रा. परबचाळ , विनोद निवासचे बाजुला , कोलशेत रोड , ढोकाळी गाव ,   ठाणे) ही महिला बेपत्ता झाल्याची नोंद कापूरबावडी   पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे .             बेपत्ता महिलेचे वर्णन असे :- नाक सरळ, चेहरा गोल , डाव्या हातांवर ओमी व गुरु असे इंग्रजीत गोंदलेले आहे .             अशी महिला जर कोणाला आढळल्यास कापूरबावडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

उपचार घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंदणी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आरोग्य विभागाकडे करणे बंधनकारक

  ठाणे दि. 22 (जिमाका): खाजगी क्षेत्राकडून वैद्यकीय सेवा घेणाऱ्या क्षयरुग्णांची आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालय , डॉक्टर , औषध विक्रेते यांनी जानेवारी 2021 पासून त्यांच्याकडे उपचार आणि औषधे घेणाऱ्या क्षयरुग्णांची नोंदणी जिल्हा , महानगरपालिका क्षयरोग कार्यालयात करावी , असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.गिता काकडे यांनी कळविले आहे.           केंद्रशासनाच्या अधिसूचनेनुसार   सार्वजनिक व खाजगी रुग्णालय , वैद्यकीय व्यावसायिक , वैज्ञानिक प्रयोगशाळा , औषधविक्रेते यांच्याकडून उपचार आणि औषधे घेणाऱ्या प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय , डॉक्टर्स , औषधविक्रेते यांनी दरमहा जिल्हा , शहर क्षयरोग कार्यालयाकडे रुग्णांची नोंदणी करणे आवश्यक आहे.             प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद होवून त्यावर उपचार करणे , क्षयरोगाचा प्रसार रोखणे यासाठी नोंदणीकरणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्...

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेत ठाणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत - कृषि विभागाचे आवाहन

ठाणे , दि. 22 (जिमाका): मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेद्वारे ठिबक व तुषार सिंचनासाठी पूरक अनुदान देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ठाणे , मुरबाड , कल्याण , शहापूर , भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठीजास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत , असे आवाहन जिल्हा पर्यवेक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी केले आहे.         मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेची अंमलबजावणी विदर्भ व मराठवाड्यातील 17 जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच , उर्वरीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्यांमध्ये राबविण्यात येत होती. ही योजना राज्यातील उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सहा तालुक्यामधील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. या नविन योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संच बसविण्यास चालना मिळेल. या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत अल्प व अत्यल...

अनुसूचित जातीतील तरुणांनी केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

  ठाणे दि. 11   ( जिमाका) : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील नवउद्योजक तरुणांसाठी केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत कर्ज मिळणार आहे. तरी ठाणे जिल्ह्यातील नवउद्योजक तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा , असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीतिमित्त केंद्र शासनाने अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना सुरु केली आहे. या योजनेमधून    महाराष्ट्र शासनाने   सामाजिक   न्याय   व विशेष सहाय्य विभाग अन्वये जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील तरुण नवउद्योजकांना १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मुल्याच्या १५ टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत देण्यात येणार आहे. पात्र इच्छुक नवउद्योजकांनी सहायक आयुक्त ,   समाज कल्याण ,   ५ वा मजला ,   जिल्हाधिकारी कार्यालय ,   कार्ट नाका ,   ठा...

इयत्ता बारावीच्या परीक्षा गुणपत्रिकेसाठी विकल्प सादर करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

ठाणे दि. 18 ( जिमाका)   : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंड ळाशी   संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा ,   कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक ,   प्राचार्य ,   शिक्षक ,   विद्यार्थी व पालक फेब्रुवारी-मार्च २०२० व नोव्हेंबर-डिसेंबर २०२० परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ठ झालेल्या व विकल्प सादर करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. १५ डिसेंबर ,   २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे , अशी माहिती   राज्य   मंडळांचे सहायक सचिव पोपटराव महाजन यांनी कळवि ली   आहे. कोविडमुळे उद्भवलेली परिस्थिती व विद्यार्थी हित पाहता ,   विशेष बाब म्हणून विकल्प सादर करण्यास मुदत वाढ देण्यात येत आहे.फेब्रुवारी-मार्च २०२० व नोव्हेंबर-डिसेंबर २०२० परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ठ झालेले विद्यार्थी ,   शिक्षक ,   मुख्याध्यापक ,   प्राचार्य ,   सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयांशी व विभागीय मंडळांशी संपर्क साधून योग्य   ती कार्यवाही करावी ,   असे आवा...