Posts

महसूल विभागात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून सामान्यांना दिलासा द्यावा महसुल दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन

Image
ठाणे, दि.१ (जिमाका): महसूल विभागाच्या कामकाजात काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करावे. त्याचबरोबर प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. राज्य शासनाने ४० वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक केले असून त्याचाच एक भाग म्हणून पुढील वर्षापासून अधिकारी-कर्मचारी यांच्या जोडीदाराची देखील वैद्यकीय तपासणी केली जाईल, असे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनच्या समिती सभागृहात महसुल दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, रेवती गायकर, अर्चना कदम, रोहीत राजपूत आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना महसुल दिनाच्या शुभेच्छा देत महसुल विभाग काळानुरूप बदलतोय दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून सामान्यांना दिलासा देण्याचे काम करतानाच स्वतासोबतच सामान्यांचे जगणे सुंदर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी केले. अध...

महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम, २०२२ बाबत हरकती/सूचना पाठविण्याचे आवाहन

ठाणे दि. 26 (जिमाका) :-   महाराष्ट्र शासनाचे अंतर्गत महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा ,   आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम ,   २०२२ चा मसुदा महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दि. १८ जुलै २०२२ रोजी अधिसुचनाव्दारे प्रसिध्द केले आहे. सदर अधिसुचनेव्दारे प्रसिध्द केलेल्या मसुद्यांबाबत ४५ दिवसांचे आत हरकती / सुचना मागविण्यात येत आहेत ,  असे कामगार उपायुक्त संतोष भोसले यांनी कळविले आहे.             हा मसूदा     www.maharashtra.gov.in   आणि   www .mahakamagar.maharashtra.gov. in   या राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कायदे व नियम या पर्यायाखाली प्रसिध्द करण्यात आल्या आहे.              महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा ,   आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम २०२२ चा कामगार नियम प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास त्या ,  कामगार आयुक्त ,   महाराष्ट्र राज्य ,   कामगार भवन ,   ४ था मजला ,   सी २० ,   ई ब...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

  ठाणे ,  दि. २ 6  (जिमाका) :  ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज  23  व्या कारगिल विजय दिना निमित्ताने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शहिदांना अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, तहसिलदार (महसूल) राजेंद्र चव्हाण, तहसिलदार (सामान्य प्रशासन) राजाराम तवटे, तहसिलदार राहुल सारंग व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव(निवृत्त) यांनी  शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. 000000

मुद्रांक शुल्काच्या दंड सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    ठाणे ,   दि.   26   (जिमाका) :-   नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा दि .   ३१ जुलै २०१२ रोजी संपत आहे. थकित मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकित शास्ती या संबंधी पक्षकारांना दि .   ३१ मार्च २०२२ पूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या असतील व त्यांनी  अद्याप या योजनेचा फायदा घेतला नसेल तर त्या संबंधितांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता तात्काळ जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा ,   असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.              संबंधित पक्षकारांनी दि. ३१ जुलै २०२२ रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास या सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजे थकित शास्तीवरील ९०% सवलतीचा लाभ मिळेल अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकित शास्तीवर ५०% दंड भरावा लागेल ,  असे मुद्रांक विभागाने कळविले आहे. योजनेचे संक्षिप...

इतर मागास प्रवर्गातील गरजू व्यक्तींनी शामराव पेजे महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    ठाणे ,   दि.   26   (जिमाका) :-   शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फेत थेट कर्ज योजना ,   वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ,   गट कर्ज व्याज परतावा ,   शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना व बीज भांडवल योजना अशा विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. इतर मागास प्रवर्गातील जास्तीत जास्त तरुणांनी या योजनांचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. ही महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची कोकण विभागासाठीची उपकंपनी आहे. हे महामंडळ हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून हे महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गांतील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. व्याज परतावा योजनेमध्ये बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज १२ टक्के पर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येते. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँक ,   खाजगी बँका तसेच सहकारी बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे. महामंडळाच्या मुख्यालय...

स्वातंत्र्याचा का अमृत महोत्सवातंर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे कथन शहापूर आणि मुरबाडमध्ये 28 व 29 जुलै रोजी ‘उज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सव

              ठाणे ,   दि.   26 ( जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि महाराष्ट्रातील महावितरण ,   महानिर्मिती ,   महापारे षण व इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राज्य शासनाच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील   शहापूर येथे 28 जुलै रोजी व मुरबाड येथे 29 जुलै रोजी   ‘ उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- पॉवर   @ 2047 ’  हा कार्यक्रम   आयोजित करण्यात आला आहे ,  अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. शहापूर मधील   ठाणे जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज संघाच्या वि. वि. भोपतराव वैश्य समाज हॉलमध्ये   28   जुलै रोजी सायंकाळी   4   वाजता   हा कार्यक्रम होणार आहे. तसेच     आणि मुरबाड तालुक्यातील ओजिवले (धसई)   मधील   सिद्धीविनायक मंगल कार्यालयात   29   जुलै रोजी सकाळी   10   वाजता   या   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

पशुपक्षास खाण्यासाठी योग्य तांदूळाच्या विक्रीसाठी आवाहन

    ठाणे दि. 26(जिमाका) :-  शिधावाटप दुकान क्र.  36  फ  18 मधील 645 कि.ग्रॅ. तांदूळ खराब झाल्याने ते पशुखाद्य म्हणून विक्री करण्यात येणार आहे. हे तांदुळ घेऊ इच्छिणाऱ्या संस्था,संघटना अथवा व्यक्तिंनी 30 जुलैपर्यंत आपल्या निविदी शिधावाटप कार्यालयात पाठविण्याचे आवाहन शिधावाटप अधिकारी एस.आर. चव्हाण यांनी केले आहे.              शिधा वाटप दुकान क्र. 36 फ 18 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील 645 कि.ग्रॅ. तांदूळ खराब झाल्याचे प्रयोगशाळा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून हे तांदूळ पशुपक्षास खाण्यास योग्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे हे खराब झालेले तांदूळ लिलाव पद्धतीने पशुखाद्य म्हणून विक्री करण्यात येणार आहे. ज्या संस्था व्यक्ती सदर तांदूळ विकत घेण्यास इच्छुक असतील त्यांनी या मालाची दि. 28 जुलै 2022 पर्यंत अधिकृत शिधावाटप दुकान क्र. 36 फ 18 पोलिस लाईन ठाणे (पूर्व) या ठिकाणी जावून पाहणी करु शकतील. तसेच तपासणी नमुना शिधावाटप अधिकारी, 36 फ ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्ट नाका, ठाणे (पू...