Posts

Showing posts from May, 2019

विश्वस्त या भावनेतून सरकारचे काम -मुख्यमंत्री फडणवीस

Image
      नवी मुंबई, दि.३१(जिमाका)- सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते , असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.            श्री गोवर्धिनी सार्वजनिक सेवा संस्था नवी मुंबई आयोजित नवी मुंबई उत्सव 2019 चे उदघाटन ना.फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी माजी राज्यपाल डॉ.डी वाय पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सिडको चे अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आ.रमेश पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, विजय चौगुले, आ.मंदाताई म्हात्रे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामस्वामीआदी मान्यवर उपस्थित होते.          कै गणपतशेट तांडेल मैदान, नेरुळ येथे हा शानदार कार्यकम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोवर्धिनी संस्थेच्या वतीने 11 लाख रुपयांचा निधी दुष्काळ निवारणासाठी मुख...

कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी 10 जूनपर्यंत मुदत

ठाणे दि. 31 (जिमाका)- माध्यमिक शाळा अभ्यासक्रमात सन 2018-19 या शैक्षणिक वर्षा पुर्वी कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना   मार्च 2019 च्या इयत्ता 10 वी च्या परिक्षेसाठी ‘ ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट्स’ चा लाभ देण्यासाठी 10 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.   हा लाभ देण्यासाठी 10 जून पर्यंत अर्ज मागवून   ते संबंधित विभागीय मंडळात संबंधित विद्यालयाच्या   प्रमुखांनी सादर करावयाचे आहेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण   मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Image
ठाणे दि. 31 (जिमाका)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.   पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी उपेंद्र तामोरे , तहसीलदार सर्वसाधारण राजाराम तवटे , नायब तहसीलदार सिंधू खडे आदी अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू व्यसन मुक्तीची शपथही देण्यात आली.

कौस्तूभ तारमाळे यांना सर्वोत्तम जीवनरक्षा पदक मरणोत्तर प्रदान पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते मातोश्री रत्नप्रभा तारमाळे यांनी केला स्विकार

Image
ठाणे दि. 31 (जिमाका)- जिल्ह्यातील कौस्तूभ भगवान तारमाळे यांनी बुडणाऱ्या मुलांचे प्राण मोठ्या धाडसाने वाचविले होते. परंतू या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सर्वोत्तम जीवनरक्षा पदक मरणोत्तर जाहीर झाले. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,(सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिवंगत कौस्तूभच्या मातोश्री श्रीमती रत्नप्रभा भगवान तारमाळे यांना हे जीवनरक्षा पदक सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरे, आ. ज्योती कलाणी, आ.बालाजी किणीकर,आ. शांताराम मोरे, आ. गणपत गायकवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषी सभापती श्रीमती गुळणी, अपर मुख्य सचिव व प्रधान सचिव उद्योग तथा पालक सचिव ठाणे जिल्हा सतीश एम गवई, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे मनपा आयुक्त जयस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने व अन्य अधिकारी...

मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक आपत्ती व्यवस्थापनाचे काम संघभावनेने करावे- ना.एकनाथ शिंदे

Image
ठाणे दि. 31 (जिमाका)- जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचे आकलन करून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करताना, आपत्ती व्यवस्थापनाचे काम हे सर्व विभागांनी संघभावनेने करणे आवश्यक आहे,अशी सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,(सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज येथे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना केली. ठाणे जिल्ह्यात मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री ना. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरे, आ. ज्योती कलाणी, आ.बालाजी किणीकर,आ. शांताराम मोरे, आ. गणपत गायकवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषी सभापती श्रीमती गुळणी, अपर मुख्य सचिव व प्रधान सचिव उद्योग तथा पालक सचिव ठाणे जिल्हा सतीश एम गवई, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने व अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. यावेळी निर्देश देण्...

खरीप हंगाम 2019 आढावा बैठक शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवा-ना.एकनाथ शिंदे जिल्ह्यात 65 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन

Image
ठाणे दि. 31 (जिमाका)- खरीप हंगामाचे नियोजन करीत असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन पीक पद्धती,पोहोचवावे तसेच पीक कर्ज, पीक विमा,अनुदान यासारख्या आर्थिक सुरक्षा देणाऱ्या योजनाही त्यांच्या पर्यंत पोहोचवाव्या व जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,(सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सन 2019 च्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 65 हजार 909 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे नियोजन करण्यात आले असून या हंगामात 1 लक्ष 57 हजार 949 मे. टन पिक उत्पादनाचा लक्षांक ठरविण्यात आला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या खरीप नियोजन बैठकीत ही माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरे, आ. ज्योती कलाणी, आ.बालाजी किणीकर,आ. शांताराम मोरे, आ. गणपत गायकवाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषी सभापती श्रीमती गुळणी, अपर मुख्य सचिव व प्...

पाणी टंचाई आढावा बैठक टंचाई भागातील पाणी पुरवठ्यास सर्वोच्च प्राधान्य द्या- ना.एकनाथ शिंदे

Image
ठाणे दि. 31 (जिमाका)- जिल्ह्यात पाणी टंचाई असलेल्या भागात टंचाई निवारणाची   कामे पूर्णत्वास नेण्यास सर्वोच्च प्राधान्य देऊन यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करावीत. ग्रामिण भागात दिले जाणारे पाण्याचे प्रति व्यक्ति प्रमाणही वाढवावे, तसेच पाण्याचे स्त्रोत प्रदुषित होणार नाहीत याबाबत कडक उपाययोजना करण्याची गरज असून त्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री,(सार्वजनिक उपक्रम),सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील पाणी टंचाई व त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, खा.कपिल पाटील, आ.किसन कथोरे, आ. ज्योती कलाणी, आ.बालाजी किणीकर,आ. शांताराम मोरे, आ. गणपत गायकवाड,जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, कृषी सभापती श्रीमती गुळणी, अपर मुख्य सचिव व प्रधान सचिव उद्योग तथा पालक सचिव ठाणे जिल्हा सतीश एम गवई, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, जिल्हा अधि...

स्वाधार योजनेसाठी इच्छुक संस्थाकडून प्रस्ताव मागविले

स्वाधार योजनेसाठी इच्छुक संस्थाकडून प्रस्ताव मागविले ठाणे दि. 30 (जिमाका): महाराष्ट्र शासनामार्फत संकटग्रस्त पिडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना राज्यात कार्यान्वीत करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह आपले प्रस्ताव संबधित जिल्हयाच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे दि. 6 जून   पर्यंत सादर करावेत , असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी , ठाणे यांनी केले आहे. स्वाधार योजनेकरीता अटी व शर्ती:- 1.संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणीकृत असावी 2.संस्थेस महिला व बाल विकास क्षेत्रातील किमान 5 वर्षे कामाचा अनुभव असावा. 3.संस्थेची अर्थिक परिस्थिती चांगली असावी 4.संस्थेच्या नावे किमान 15 लक्ष इतकी रक्क्म बॅकेत मुदत ठेव म्हणून असणे आवश्यक आहे. 5.योजना राबविण्याकरीता इच्छूक संस्था त्याच जिल्हयातील असावी. 6.संस्था निती आयोगाच्या पोर्टलवर नोंदणीकृत असावी.निती आयोगाच्या दर्पण पोर्टलवर नोंदणी नसल्...

जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवाड्यानिमित्त जनजागृती ओआरएस पाकीटे व झिंक टॅबलेटचे वाटप करणार

जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवाड्यानिमित्त जनजागृती ओआरएस पाकीटे व झिंक टॅबलेटचे वाटप करणार ठाणे, दि. 24 (जिमाका)- जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांमार्फत   मंगळवार दि.28 ते   रविवार दि.9 जून या कालावधीत   अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. या कालावधीत आरोग्य यंत्रणांमार्फत घरोघरी जाऊन अतिसाराबाबत जनजागृती व कारणे- उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून या वर्षी राज्यात हा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. अतिसार नियंत्रण व उपचारासाठी जिल्ह्यात 15 लक्ष 18 हजार 720 ओआरएसची पाकीटे व   1 कोटी 5 लाख 55 हजार 922 झिंक टॅबलेट्स प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य यंत्रणांनी दिली. या उपक्रमात अतिसाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.   तसेच अतिसाराचे कारणे व उपचार याबाबतही मार्गदर्शन केले जाणार आहे.   वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व,   ओआरएस द्रावण तयार करण्याचे प्रशिक्षण, हात धुण्याचे प्रशिक्षण शाळा व अंगणवाडीतील मुलांना देण्यात येणार आहे. तसेच शून्य ते पाच वर्षे या वयोगटातील अतिस...

स्कूल बस, व्हॅन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण

ठाणे, दि. 22 (जिमाका)- योग्यता प्रमाणपत्राची मुदत संपलेल्या सर्व स्कूल बसेस व व्हॅन्स यांच्या योग्यता प्रमाणपत्राच्या नुतनीकरणासाठी स्कूल बसेस तपासणीसाठी आणाव्यात असे आवाहन, प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांनी केले आहे. महाराष्ट्र स्कूल बसेस करीता विनियम, नियम 2011 मधील नियम 10 मधील तरतूदीनुसार योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण आवश्यक असते. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुक सुरक्षेसाठी   हे आवश्यक आहे. तरी सर्व स्कूल बस वाहन चालक, मालक तसेच शालेय व्यवस्थापन   यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे संपर्क साधून वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले आहे.    00000

डोंबिवली(पूर्व) वाहतुक मार्गात बदल

ठाणे, दि. 22 (जिमाका)- लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने 24- कल्याण या लोकसभा मतदारसंघाची मतमोजनी ही   गुरुवार दि.23 रोजी डोंबिवली   पूर्व येथील ह.भ. प. सावळाराम क्रीडा संकूल येथे होणार आहे. त्याअनुषंगाने   या परिसरात होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी खालील उपाययोजना करण्यात आल्या आहेत.   या भागातील बंदीश हॉटेल ते घरडा सर्कलकडे येणाऱ्या रोडवर व घरडा सर्कल ते बंदीश पॅलेस हॉटेलकडे जाणाऱ्या रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील सर्व वाहतुक   डोंबिवलीकडून घरडा सर्कल मार्गे बंदीश पॅलेस हॉटेलकडे जाणारी वाहने सरळ घरडा सर्कल येथून रिजेन्सी – सुयोग हॉटेल येथून इच्छित स्थळी जातील. त्यसेच बंदीश पॅलेस हॉटेलकडून घरडा सर्कलकडे   जाणारी वाहने   सावित्रीबाई फ्गुले नाट्यगृह भारत गॅस गोडावून , पेंढारकर कॉलेज ते घरडा सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील. सदरचे बदल ठाणे पोलीस आयुक्तालयाचे वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी   एका अधिसुचनेद्वारे केले आहेत. ही अधिसुचना मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील. तसेच ही अधिसुचना पो...

अल्पसंख्याक विकास विभागाच्या योजनांच्या लाभासाठी प्रस्ताव मागविले

ठाणे, दि. 21 (जिमाका)- शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळांमध्ये   अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून   पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी   राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजनांअंतर्गत सन 2019-20 या वर्षाकरीता अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. तसेच डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गतही पात्र मदरशांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव संबंधित संस्थांनी 31 ऑगस्ट 2019 पर्यंत जिल्हा नियोजन समिती कार्यालय, तिसरा मजला, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे सादर करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी केले आहे. 00000

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ

Image
ठाणे, दि. 21 (जिमाका)- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाच्या निमित्ताने अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामुहिकपणे दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी सर्व उपस्थितांना शपथ वाचून दाखविली व साऱ्यांनी ती सामुहिकपणे घेतली. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

मतमोजणी केंद्र परिसरात मनाई आदेश

ठाणे, दि. 20 (जिमाका)- लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने येत्या गुरुवारी दि.23 रोजी जिल्ह्यात मतमोजणी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील मतमोजणी केंद्र परिसराच्या 100 मिटर   परिसरात    कलम 144 (1) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. सदरचे म नाई आदेश जिल्हादंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत. हे आदेश नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी, निरीक्षक. मतमोजणी अधिकारी, कर्मचारी   उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी इ. ना हे आदेश लागू असणार नाहीत, असेही जिल्हादंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे. सदरचे आदेश हे दि. 24 रोजी मध्यरात्री पर्यंत लागू असतील. 00000

ठाणे ग्रामीण भागात मनाई आदेश

ठाणे, दि. 20 (जिमाका)- आगामी काळात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलीस अधिक्षक ठाणे (ग्रामिण) यांच्या कार्यकक्षेतील   सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत जिल्हा प्रशासनाने मनाई आदेश जारी केले आहेत. येत्या 3 जून पर्यंत   कलम 37(1)(3) अन्वये कायदा सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केले आहेत. 00000

अनुसूचित जमातीच्या मुला /मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

ठाणे, दि. 20 (जिमाका)- महाराष्ट्र   शासनाचे आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातींच्या १० विद्यार्थ्यांना परदेशात पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी   शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यात एम. बी. ए.    पदव्युत्तर - २    ,      वै द्यकीय अभ्यासक्रमासाठी पदवी करीता-१/ पदव्युत्तर-   १   ,   बी.टेक (इंजिनिअरिंग) पदवी करता- १/पदव्युत्तर-१   ,   विज्ञान शाखेसाठी पदव्युत्तर- १ ,   तसेच कृषी शाखेतील पदव्युत्तर- २   ,   इतर विषयाचे अभ्यासक्रमातील पदव्युत्तर-२ अशा एकूण दहा आदिवासी विद्यार्थ्यांना   शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी निकष खालील प्रमाणे- विद्यार्थ्याचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे,   नोकरीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत असेल. परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात विद्यार्थ्याला प्रथम वर्षाकरीता प्रवेश मिळालेला असावा. विद्यार्थ्याच्या कुटूंबाची कमाल आर्थिक मर्यादा सहा लाख रुपये वार्षिक इतकी आहे. ...

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत तक्रारींचा आढावा

ठाणे,दि. 13 :   जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या आजच्या बैठकीत  ग्राहकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. आज जिल्हा नियोजन भवनातील जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी जलसिंग वळवी, सहा. नियंत्रक वैधमापन,   धान्य खरेदी अधिकारी सुनिल शिंदे,   सहा. आयुक्त अन्न औषध प्रशासन,   प्रादेशिक परिवहन कार्यालय, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जादा विजबील आकारणी व अन्य संदर्भात ग्राहकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींबाबत संबंधित यंत्रणेने केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. तसेच जनेरिक औषधे दुकानांबाबत सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासने यांनी आढावा सादर केला.अन्न औषधे प्रशासन या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तबेल्यांमधील दुधाचे नमुने तपासणी घेण्याबाबतच्या कारवाईचा आढावा सादर केला. प्रत्येक विभागाने आपल्या मार्फत ग्राहकांच्या तक्रारींबाबत विहित मुदतीत कारवाई पूर्ण करावी. तसेच आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ग्राहक सेवांबाबत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करावे,...