Posts

Showing posts from July, 2022

महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम, २०२२ बाबत हरकती/सूचना पाठविण्याचे आवाहन

ठाणे दि. 26 (जिमाका) :-   महाराष्ट्र शासनाचे अंतर्गत महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा ,   आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम ,   २०२२ चा मसुदा महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दि. १८ जुलै २०२२ रोजी अधिसुचनाव्दारे प्रसिध्द केले आहे. सदर अधिसुचनेव्दारे प्रसिध्द केलेल्या मसुद्यांबाबत ४५ दिवसांचे आत हरकती / सुचना मागविण्यात येत आहेत ,  असे कामगार उपायुक्त संतोष भोसले यांनी कळविले आहे.             हा मसूदा     www.maharashtra.gov.in   आणि   www .mahakamagar.maharashtra.gov. in   या राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कायदे व नियम या पर्यायाखाली प्रसिध्द करण्यात आल्या आहे.              महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा ,   आरोग्य व कामाची स्थिती (कामगार) नियम २०२२ चा कामगार नियम प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास त्या ,  कामगार आयुक्त ,   महाराष्ट्र राज्य ,   कामगार भवन ,   ४ था मजला ,   सी २० ,   ई ब...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

  ठाणे ,  दि. २ 6  (जिमाका) :  ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज  23  व्या कारगिल विजय दिना निमित्ताने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शहिदांना अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, तहसिलदार (महसूल) राजेंद्र चव्हाण, तहसिलदार (सामान्य प्रशासन) राजाराम तवटे, तहसिलदार राहुल सारंग व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव(निवृत्त) यांनी  शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. 000000

मुद्रांक शुल्काच्या दंड सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    ठाणे ,   दि.   26   (जिमाका) :-   नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा दि .   ३१ जुलै २०१२ रोजी संपत आहे. थकित मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकित शास्ती या संबंधी पक्षकारांना दि .   ३१ मार्च २०२२ पूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या असतील व त्यांनी  अद्याप या योजनेचा फायदा घेतला नसेल तर त्या संबंधितांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता तात्काळ जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा व दंड सवलत योजनेचा लाभ घ्यावा ,   असे आवाहन राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.              संबंधित पक्षकारांनी दि. ३१ जुलै २०२२ रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास या सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजे थकित शास्तीवरील ९०% सवलतीचा लाभ मिळेल अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकित शास्तीवर ५०% दंड भरावा लागेल ,  असे मुद्रांक विभागाने कळविले आहे. योजनेचे संक्षिप...

इतर मागास प्रवर्गातील गरजू व्यक्तींनी शामराव पेजे महामंडळाच्या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    ठाणे ,   दि.   26   (जिमाका) :-   शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळामार्फेत थेट कर्ज योजना ,   वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ,   गट कर्ज व्याज परतावा ,   शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना व बीज भांडवल योजना अशा विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. इतर मागास प्रवर्गातील जास्तीत जास्त तरुणांनी या योजनांचा लाभ घ्यावा ,  असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. ही महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची कोकण विभागासाठीची उपकंपनी आहे. हे महामंडळ हे शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असून हे महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गांतील व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. व्याज परतावा योजनेमध्ये बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज १२ टक्के पर्यंत महामंडळाकडून अदा करण्यात येते. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँक ,   खाजगी बँका तसेच सहकारी बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे. महामंडळाच्या मुख्यालय...

स्वातंत्र्याचा का अमृत महोत्सवातंर्गत विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे कथन शहापूर आणि मुरबाडमध्ये 28 व 29 जुलै रोजी ‘उज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सव

              ठाणे ,   दि.   26 ( जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि महाराष्ट्रातील महावितरण ,   महानिर्मिती ,   महापारे षण व इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राज्य शासनाच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील   शहापूर येथे 28 जुलै रोजी व मुरबाड येथे 29 जुलै रोजी   ‘ उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- पॉवर   @ 2047 ’  हा कार्यक्रम   आयोजित करण्यात आला आहे ,  अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. शहापूर मधील   ठाणे जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज संघाच्या वि. वि. भोपतराव वैश्य समाज हॉलमध्ये   28   जुलै रोजी सायंकाळी   4   वाजता   हा कार्यक्रम होणार आहे. तसेच     आणि मुरबाड तालुक्यातील ओजिवले (धसई)   मधील   सिद्धीविनायक मंगल कार्यालयात   29   जुलै रोजी सकाळी   10   वाजता   या   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

पशुपक्षास खाण्यासाठी योग्य तांदूळाच्या विक्रीसाठी आवाहन

    ठाणे दि. 26(जिमाका) :-  शिधावाटप दुकान क्र.  36  फ  18 मधील 645 कि.ग्रॅ. तांदूळ खराब झाल्याने ते पशुखाद्य म्हणून विक्री करण्यात येणार आहे. हे तांदुळ घेऊ इच्छिणाऱ्या संस्था,संघटना अथवा व्यक्तिंनी 30 जुलैपर्यंत आपल्या निविदी शिधावाटप कार्यालयात पाठविण्याचे आवाहन शिधावाटप अधिकारी एस.आर. चव्हाण यांनी केले आहे.              शिधा वाटप दुकान क्र. 36 फ 18 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील 645 कि.ग्रॅ. तांदूळ खराब झाल्याचे प्रयोगशाळा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून हे तांदूळ पशुपक्षास खाण्यास योग्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे हे खराब झालेले तांदूळ लिलाव पद्धतीने पशुखाद्य म्हणून विक्री करण्यात येणार आहे. ज्या संस्था व्यक्ती सदर तांदूळ विकत घेण्यास इच्छुक असतील त्यांनी या मालाची दि. 28 जुलै 2022 पर्यंत अधिकृत शिधावाटप दुकान क्र. 36 फ 18 पोलिस लाईन ठाणे (पूर्व) या ठिकाणी जावून पाहणी करु शकतील. तसेच तपासणी नमुना शिधावाटप अधिकारी, 36 फ ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्ट नाका, ठाणे (पू...

आरटीईअंतर्गत चौथ्या प्रतिक्षायादीतील बालकांचे प्रवेश २७ जुलैपर्यंत घेण्याचे आवाहन

  ठाणे ,  दि. २ 6 (जिमाका) : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) वंचित गटातील व दुर्बल घटकांतील २५ टक्के जागांसाठी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशासाठीच्या चौथ्या टप्प्याच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली असून चौथ्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी २७ जुलैपर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे. वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक स्तरावरील इ. 1 ली ते 8 वी पर्यंतचे शालेय शिक्षण विनाशुल्क मिळावे. यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आरटीई अंतर्गत  २५  टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सन 2022-23 ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात आर.टी.ई. 25% प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीमधील चौथ्या प्रतिक्षायादीत जिल्ह्यातील एकूण 125 अर्जांची निवड झाली आहे. या प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दि. 27 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रतिक्षा यादीतील बालकांचे प्रवेश घेण्यासाठी पालकांनी यादी नाव...

सैनिकी मुलांचे वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज करण्यास १९ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

ठाणे ,  दि. २ 6  (जिमाका) :    ठाणेमधील नौपाडा (पश्चिम) येथील सैनिकी मुलांच्या वसतीगृहामध्ये माजी सैनिक, सेवारत सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, युद्ध विधवा यांच्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात येते. या वसतीगृहामध्ये प्रवेश अर्जासाठी 19 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (नि.) प्रांजल जाधव यांनी केले आहे.  नौपाडा येथील धरमवीर नगर, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे सैनिकी मुलांचे वसतीगृह आहे. या वसतीगृहामध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी विविध महाविद्यालयात इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण आणि तांत्रिक विद्यालयामध्ये शिकत असलेल्या माजी सैनिकांच्या मुलांकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून परिपूर्ण अर्ज दि.22 जुलै 2022 पर्यंत मागविण्यात आले होते. मात्र, निकाल उशीरा लागल्यामुळे प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली असून आता 19 ऑगस्ट 2022 रोजी  सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यात येतील. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज जमा केले आहेत, त्यांनी पालक...

ठाणे जिल्ह्यात १३ ऑगस्टला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या तीन राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून १ लाख ५८ हजार ७०२ प्रकरणे निकाली

  ठाणे, दि. २५ (जिमाका): ठाणे येथील जिल्हा सेवा प्राधिकरणामार्फत डिसेंबर, मार्च आणि मे या महिन्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आतापर्यंत १ लाख ५८ हजार ७०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. अशी  माहिती प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली. दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.        ठाणे जिल्ह्यातील जिल्हा व तालुका न्यायालयाच्या ठिकाणी  शनिवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वाजता राष्ट्रीय लोकन्यायालय घेण्यात येईल. पक्षकारांनी न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी या राष्ट्रीय लोकन्यायालयात ठेवावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री यांनी केले आहे. न्यायालयातील सर्व प्रलंबित दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये दिवाणी दावे, बँकांची कर्ज वसुली प्रकरणे, कौटुंबिक कलहाची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, विद्युत महामंडळाची वसूली प्रकरणे, राज्य परिवहन महामंडळाची प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे इ. व फौजदारी तडजोडजन्य प्रकरणे, धनादेश अनादराची प्रकरणे (कलम १३८ एन. ...

ठाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण विशेष सत्राचे आयोजन अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतला बुस्टर डोस

Image
ठाणे, दि. २५ (जिमाका): जिल्हा परिषद ठाणे येथे आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी बुस्टर डोस घेतला. पहिला आणि दुसरा डोस व बुस्टर डोस करीता पात्र असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष सत्रात लसीकरण करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या संकल्पनेतुन हे विशेष सत्र घेण्यात आले. यावेळी सुमारे १५३ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. सर्व जिल्हा परिषद कर्मचारी तसेच ठाणे जिल्ह्यातील लसीकरणास पात्र सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन यावेळी अध्यक्षा श्रीमती पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

राज्यांतर्गत पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन

  ठाणे दि. 22(जिमाका) :-  राज्यातील    पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी ,  शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने तृणधान्य व कडधान्य पिकांची राज्यांतर्गत पिक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भात व नागली पिक उत्पादक शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करावे ,  असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.            प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना मिळावे ,  पिक उत्पादनात वाढ व्हावी ,  तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा ,  या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने तृणधान्य व कडधान्य पिकांची राज्यांतर्गत पिक स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा तालुका पातळी ,  जिल्हा पातळी ,  विभाग व राज्य पातळी यास्तरावर आयोजित केली जाते.            ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी भात व नागली पिकांचा समावेश स्पर्धेसाठी करण्यात आला आहे. स्पर्धेत सह...

ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिसरात 24जुलै ते ७ ऑगस्ट पर्यत मनाई आदेश जारी

    ठाणे ,  दि. २२ (जिमाका) :  ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी   ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दि. २४ जुलै २०२२ ते  दि. ०७ ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.             या कालावधीत शस्त्रे ,  सोटे ,  तलवारी ,  भाले ,  दंड ,  बंदुका ,  लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे ,  बाळगणे ,  जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे ,  जमा करणे व तयार करणे. कोणताही ,  दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे ,  बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे ,  गाणी म्हणणे ,  वाद्य वाजविणे इत्यादी. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे ,  जाहीर सभा घेणे ,  मिरवणुका काढणे ,  घोषणा ,  प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई करण्यात आली...

कृषि यांत्रिकीकरण योजनेतून ठाण्यातील शेतकऱ्यांना 1 कोटी 85 लाखांचे अनुदान जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत अर्ज करण्याचे कृषि अधिकाऱ्यांचे आवाहन

  ठाणे, दि. 21 (जिमाका) – कृषि विभागाच्या विविध योजना एकाच अर्जाद्वारे मिळावे, यासाठी शासनाने एकात्मिक संगणक प्रणाली राबविली आहे. महाडिबीटीच्या माध्यमातून योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात देण्यात येतो. कृषि यांत्रिकीकरण योजनेतून सन 2021-22 या वर्षात ठाणे जिल्ह्यातील 237 लाभार्थ्यांना शेती औजारे/यंत्रे खरेदीपोटी सुमारे 1 कोटी 85 लाख अनुदान देण्यात आले आहे.  राज्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शासनाने कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरुस्कृत कृषि यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी एकच संगणक प्रणाली विकसित केली आहे. यानुसार महाडिबीटी पोर्टलवरील शेतकरी योजना या सदरामध्ये एकच अर्ज करून या सर्व योजनांचा लाभ घेता येणार आहे. यांत्रिकीकरण योजनेत शासनाने काही बदल केले आहेत. त्यानुसार, ट्रॅक्टर चलित औजारांसाठी आरसी पुस्तक बंधनकारक केले आहे. तसेच ही औजारे खरेदी ही कॅशलेस पद्धतीने करावे लागणार आहे. पूर्वसंमती अपलोड केलेल्या कोटेशन व चाचणी अहवालप्रमाणेच औजारांची खरेदी करणे बंधन कारक आहे, यासह इतर बदल यामध्ये करण्यात आले आ...

1 ऑगस्ट पासून ठाणेकरांना मिळणार 50 एमएलडी अतिरिक्त पाण्याचा लाभ जलसंपदा विभागाने ठाणे शहराला अतिरिक्त पाणी देण्याला दिली मंजुरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाणेकरांना मिळाला मोठा दिलासा

मुंबई :- 1 ऑगस्ट पासून ठाणे शहरातील नागरिकांना 50 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याला राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाला ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे  निर्देश दिले होते. यानुसार राज्याच्या जलसंपदा विभागाने अतिरिक्त 50 एमएलडी पाणी देण्याला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे ठाणे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. खर तर ठाणे शहराचा वेगाने विस्तार झाल्यामुळे विस्तारित ठाणे शहराला पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेला मोठी कसरत करावी लागत होती. मात्र आता हे पाणी मिळाल्यामुळे त्यांना दिलासा देणे पालिकेला देखील शक्य होणार आहे.  ठाणे शहराला दररोज 485 दशलक्ष मिलिलिटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे तो देखील अपुरा पडू लागला होता. मध्य वैतरणा जलाशयाची उंची वाढवण्यात आल्याने जास्त पाणी अडवणे शक्य होत असल्...

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

ठाणे, दि. 8 (जिमाका) : - ठाणे येथील कुंजविहार समोरील सॅटीस ब्रिजवर, ठाणे रेल्वे स्टशन येथे बेशुध्द अवस्थेत अनोळखी इसम आढळल्याने त्यास औषधोपचारासाठी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात आणले असता दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यु झाल्याची नोंद ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.             मयत अनोळखी इसमाचे वर्णन असे :-  अंदाजे वय 40 वर्षे, रंग सावळा, उंची 4 फुट 9 इंच, बांधा सडपातळ, नाक चपटे, चेहरा गोल, डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले, दाढी व मिशी वाढलेली , अंगात निळ्या रंगाचा त्या पांढऱ्या रेषा असलेला शर्ट व काळ्या रंगाची  फुल पॅन्ट आहे. सदर मयत अनोळखी इसमाचे जर कोणी वारस किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी ठाणे नगर पोलीस   ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर पोलीस स्टेशन, ठाणे  यांनी केले आहे.

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला

ठाणे, दि. 20 (जिमाका) : - ठाणे येथील सॅटीस ब्रिजखाली पायऱ्यांच्या फुटपाथवर, ठाणे रेल्वे स्टशन येथे बेशुध्द अवस्थेत अनोळखी इसम आढळल्याने त्यास औषधोपचारासाठी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात आणले असता दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यु झाल्याची नोंद ठाणे नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.             मयत अनोळखी इसमाचे वर्णन असे :-  अंदाजे वय 50 ते 55 वर्षे, रंग सावळा, उंची 5 फुट 1 इंच, बांधा सडपातळ, नाक सरळ, डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले, दाढी व मिशी वाढलेली , अंगात काळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे. सदर मयत अनोळखी इसमाचे जर कोणी वारस किंवा नातेवाईक असतील तर त्यांनी ठाणे नगर पोलीस   ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर पोलीस स्टेशन, ठाणे  यांनी केले आहे. 000000

कल्याणमधील मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

ठाणे, दि. 20 (जिमाका) : कल्याण येथील  मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात रिक्त असणाऱ्या जागांवर सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता शालेय (इ.10 वी ते 11 वी) व महाविद्यालय विभागातील विद्यार्थिनीना मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. तरी गरजू विद्यार्थिनींनी वसतिगृहात प्रवेशाकरिता अर्ज करण्याचे आवाहन वसतिगृह अधिक्षकांनी केले आहे.  हे वसतिगृह कल्याणमधील पुष्पकथाम बिल्डींग, ए विंग, 1 ला माळा, बेतुरकरपाडा, कल्याण (प) येथे आहे. प्रवेश अर्ज वसतीगृह कार्यालयात मोफत उपलब्ध असून गरजू विद्यार्थिनींनी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा. शासकीय वसतिगृह प्रवेशाकरीता अर्ज भरण्याचा कालावधी खालील प्रमाणे आहे. इयत्ता 10 वी व 11 वी नंतरचे अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनींनी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) वसतिगृह प्रवेशाकरीता दि. 30 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. इयत्ता 12 वी  नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थींनींनी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशाकरीता दि. 24 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. व्यावसायिक अभ्यासक्रम घेतलेल्या विद्यार्...

ठाणे येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    ठाणे ,  दि. 6 ( जिमाका)   :   ठाणे मधील कोठारी कंपाऊंड येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थींनीनी अर्ज करावे ,  असे आवाहन वसतीगृहाच्यावतीने करण्यात आले आहे.    मागासवर्गीय मुलींचे हे वसतिगृह कोठारी कंपाऊंड ,  टिकुजिनिवाडी समोर ,  चितळसर ,  मानपाडा ,  घोडबंदररोड ,  ठाणे पश्चिम येथे आहे. या वसतिगृहात इयत्ता  8  वी पासून पुढील वर्गात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थिंनींना सन  2022-23  करीता प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यानींनी     कार्यालयीन वेळेत उपरोक्त पत्यावर संपर्क साधावा ,  असे मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहच्या गृहपालांनी कळविले आहे. 000000

ड्रोन, क्षेपणास्त्र, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टच्या पूर्व परवानगीशिवाय उड्डाणास पोलीस आयुक्तालय हद्दीत बंदी

  ठाणे ,  दि. 19 (जिमाका)   :    पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी व मानवी जीवनाच्या सुरक्षिततेला व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ नये. यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन ,  नियंत्रीत क्षेपणास्त्र ,  पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास 23 जुलै ते 20 सप्टेंबर या कालावधीत बंदी घालण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.             यासंबंधी डॉ. पठारे यांच्या स्वाक्षरीने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आला आहे. या आदेशानुसार, पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय रिमोटद्वारे कंट्रोल होणारे ड्रोन ,  नियंत्रीत क्षेपणास्त्र ,  पॅराग्लायडर्स किंवा मायक्रो लाईट एअर क्राफ्ट यांच्या उड्डाणास 60 दिवसांसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट ड्र...

भातसा धरणातून उद्या, 20 जुलै रोजी सकाळी पाणी सोडण्यात येणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  ठाणे ,  दि. 19 (जिमाका)   :   भातसा धरण क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे धरणातील संभाव्य येवा वाढला आहे. त्यामुळे उद्या ,  दि. 20 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता धरणाचे पाच वक्रद्वार उघडून सुमारे 6215.44 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भातसा नदीकिनाऱ्यावरील विशेषःत शहापूर-मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील इतर गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिली आहे.               भातसा धरणात आज दु.12.30 वाजेपर्यंत 138.10 मीटर एवढी पाणी पातळी होती. धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व लाभ क्षेत्रात वाढत्या पावसामुळे आणखी संभाव्य येवा वाढला आहे.    त्यामुळे धरणातील पाणी पातळी नियमित करण्यासाठी उद्या दि. 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता धरणाचे 1 ते 5 क्रमांकाची वक्रद्वारे 0.50 मीटरने उघडण्यात येणार आहेत. यातून धरणातील 6215.44 क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याचे भातसा नगर येथील पाटबंधारे उपविभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी कळविले आहे.    त्यामुळे भातसा नदीच्या किनाऱ्यावरील शहापूर-म...

भातसा धरणाची पाणी पातळी १३४ मीटर सापगाव व नदीकाठावरील नागरीकांना सतर्कतेच्या सूचना

  ठाणे दि. 15(जिमाका) :-   आज सायंकाळी ५.०० वाजता भातसा धरणाची पाणी पातळी १३४. ०८ मी. एवढी असून भातसा धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा थोडा वाढला आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी ,  जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करणेसाठी ,  भातसा धरणाची वक्रद्वारे येणाऱ्या काही दिवसात उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामस्वरूप भातसा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग प्रवाहीत करण्याची शक्यता आहे. त्यामुळे भातसा नदीच्या काठावरील विशेषतः शहापूर- मुरबाड रस्त्यावरील सापगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत.

मतदार यादीतील नावाशी आधार क्रमांक जोडणीसाठी ठाणे जिल्ह्यात 1 ऑगस्टपासून विशेष मोहिम - उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम

मतदार यादीत आधार क्रमांक जोडणी करणे ऐच्छिक ठाणे ,  दि. 15 (जिमाका)   : -   भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार कार्डशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम ठाणे जिल्ह्यात    1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार आहे. आधार क्रमांक जोडणी ऐच्छिक असल्याने जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करावी ,  त्यासाठी राजकीय पक्ष ,  संघटनांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा ,  असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी आज येथे केले. कालबद्धपद्धतीने मतदारांकडून आधारक्रमांक प्राप्त करून घेण्याचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने सुरू केला आहे. मात्र ,  मतदान कार्डबरोबर आधार जोडणी ऐच्छिक आहे. या मोहिमेसंबंधी माहिती देण्यासाठी आज राजकीय पक्ष ,  संघटनांची बैठक श्रीमती कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी श्रीमती कदम यांनी आवाहन केले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अशी होईल नोंदणी प्रत्येक मतदारांकडून आधार क्रमांक विहीत स्वरूपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. 17 जून 2...